पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बचेरी रस्त्यावर असणाऱ्या डाॅकटर सागर गजानन जाधव यांचे हाॅस्पीटल आहे .या हाॅस्पीटल मध्ये ड्रावहर मध्ये ठेवलेल्या पन्नास हजार रुपयाची अज्ञात व्यक्तीने 30 किंवा 31 ऑक्टोबर रोजी राञी चोरी झाल्याचे उघड झाले आहे. सदरच्या चोरीच्या घटनेची माहीती डाॅकटर सागर जाधव यांनी पिलीव पोलीस ठाण्यात रितसर दिली असुन या घटनेचा रितसर घटनास्थळी जाऊन हवालदार गोपाळ घोळवे यांनी रितसर पंचनामा केला असुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोपाळ घोळवे हे करीत आहेत. चौकट _ दरम्यान डाॅकटर सागर जाधव यांच्या हाॅस्पीटल मधील चोरीबरोबरच त्याच दिवशी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जवाहरलाल शेतकी विद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराचा डेव्हीआर चोरीस गेला आहे. माञ याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला नसलयाचे पोलीस प्रशासनाकडुन सांगण्यात आले. चौकट _ पिलीव परीसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक चोऱ्या झाल्या आहेत माञ सदरच्या चोऱ्यांचा तपास माञ लागला नाही. नागरिकांमध्ये यामुळे सध्या भितीचे वातावरण पसरले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















