पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी अतुल अशोक शेंडगे (रा.वाटलूज ता.दौंड,जि.पुणे ) यांचे आजोबा जगन्नाथ संभाजी पायगुडे यांच्या नावावर गणेशवाडी ता.कर्जत येथे शेत गट नं.63/2/ब मधील 0.80 आर. इतकी जमीन व 64/1 मधील 2 हेक्टर 0.5 एवढी जमिन नावावर होती. महाराष्ट्र शासनाने उजनी प्रकल्प चालू केल्याने आजोबाची नावे असलेली जमिन शासनाने संपादित केली होती. सन 2017 मध्ये फिर्यादीचे आजोबा आजारी पडल्याने त्यांना संभाळण्याकरीता वाटलूज या गावी आणले होते. वरील आरोपींनी घरी येवून आजोबांना सांगितले की,तुमची उजनी प्रकल्पात गेलेली जमीन तुम्हाला सोलापूर जिल्हयात मिळवून देतो तुम्ही फक्त कागदावर अंगठा करा,आम्ही सर्व कागदपत्रे बघून घेतो असे आरोपी म्हणाले.

दरम्यान 19 जुलै 2025 रोजी आजोबा मयत झाले. उजनी प्रकल्पाच्या जमिनीचे काय झाले याची चौकशी केली असता फिर्यादीस समजले की,आजोबा यांना शासनाकडून पुर्नवसनाची सिध्दापूर ता.मंगळवेढा येथील जमीन गट 298/1 क्षेत्र 6.88 आर,क्षेत्रापैकी 0.80 आर जमीन नावावर होती. सदर क्षेत्राचा 7/12 उतारा काढला असता त्याची खरेदी विक्री शिवकुमार मल्लिकर्जुन सोमगुंडे (रा.अरळी,ता.मंगळवेढा) यांचे नावे झाली असल्याचे दिसून आले.
फिर्यादीने मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून सदर संपादित जमिन खरेदी विक्रीच्या नकला काढून घेतल्या.त्यावेळी ही जमिन 29/8/2019 रोजी विक्री झाल्याचे निदर्शनास आले.सदर खरेदीच्या दस्तावरील फोटो व दस्तास जोडलेल्या आधार कार्ड फोटो एकच व्यक्तीचा होता. हा फोटो फिर्यादीच्या आजोबाचा नव्हता.त्यामुळे फिर्यादीच्या आजोबांची फसवणूक झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांत 10 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक नागेश बनकर हे करीत आहेत.


















