Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

G20 Summit : अमेरिकेसोबत नवे मैत्रीपर्व; मोदी-बायडेन भेटीतून भारताला काय मिळणार?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 9, 2023
in india
0
G20 Summit : अमेरिकेसोबत नवे मैत्रीपर्व; मोदी-बायडेन भेटीतून भारताला काय मिळणार?
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जी-२० परिषदेसाठी ‘वसुधैव कुटुंबकम’ व ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी भूमिका मांडत, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठीच्या तंत्रज्ञानाचा विकास आणि जागतिक शांततेसाठी नेतृत्वाची भूमिका मांडणाऱ्या भारताने याच परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेसोबत नव्या मैत्रीपर्वाची बांधणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी बैठक घेऊन द्विराष्ट्रीय संबंधांना नवी दिशा दिली.

जी-२० परिषदेसाठी सायंकाळी दिल्लीत आगमन झालेले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची बायडेन यांची ही पहिली भारतभेट आहे. यावेळी अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलन, परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिवन तर भारतातर्फे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने ही बैठक फलदायी ठरल्याचा संदेश प्रसिद्ध केला. पाठोपाठ पंतप्रधान मोदी यांनीही या बैठकीच्या निष्कर्षांची माहिती दिली. ‘आमची बैठक फलदायी ठरली. भारत व अमेरिकेच्या नागरिकांना एकत्र बांधणाऱ्या आर्थिक मुद्द्यांसह अनेक विषयांवर आम्ही चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यानची मैत्री कायम राहील व जगाच्या भल्यासाठी दोन्ही देश विशेष भूमिका बजावतील’, असे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत जेट इंजिन करार, लष्करी वापरासाठीच्या ड्रोनची खरेदी तसेच सिक्स जी स्पेक्ट्रमसाठीच्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य हे मुद्दे प्राधान्यक्रमावर होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आखाती देशांना भारतमार्गे युरोपशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची उभारणी करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आल्याचे समजते. या प्रकल्पात अमेरिका गुंतवणूक करणार आहे.

या वर्षातील या सर्वांत महत्त्वाच्या जागतिक संमेलनात यंदाचे यजमानपद भूषवणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह किमान २९ राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती राहील. परिषदेतील संयुक्त जाहीरनाम्यावर जागतिक पटलावरील सध्याचा भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी तसेच अन्नधान्य आणि ऊर्जेच्या वाढत्या किमतींवर होणारी चर्चा प्रभावी ठरणार आहे. या परिषदेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे जी-२० शेरपा अमिताभ कांत, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा, अर्थ मंत्रालयाचे सचिव अजय सेठ आणि मुख्य समन्वयक हर्षवर्धन शृंगला यांनी विविध मुद्द्यांवरील भारताची भूमिका अधोरेखित केली.

‘वसुधैव कुटुंबकम – जग एक कुटुंब आहे ही मुख्य संकल्पना घेऊन अध्यक्षपदाची सुरुवात करावी, अशी भारताची इच्छा होती. पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेनुसार भारताचे जी-२० परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, निर्णायक आणि महत्त्वाकांक्षी असावे. भारताने त्याच दिशेने परिषदेची तयारी केली आहे. जागतिक पर्यावरण निधीतील त्रुटी दूर करणे, हरित विकासाची लक्ष्यपूर्ती, महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाची प्राप्ती यांसारखे मुद्देही भारतासाठी महत्त्वाचे आहेत’, असे कांत यांनी स्पष्ट केले. ‘दिल्लीतील जी-२० परिषदेत २९ खास निमंत्रित देश आणि ११ आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग घेतला आहे. आफ्रिका महासंघातील देशांचा सहभाग म्हणजे पंतप्रधानांचा ग्लोबल साउथवर असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे. पंतप्रधानांनी दिल्लीत येणाऱ्या सर्व नेत्यांना पत्रे लिहिली आणि त्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अध्यक्षपदाचे लक्ष्य आणि दृष्टिकोन हा जागतिक चर्चेच्या मुद्द्यांवर भूमिका निश्चित करणे आहे. यामुळे सामान्य माणसांचे आयुष्य सुकर होणे शक्य होईल’, असेही ते म्हणाले.

शृंगला यांनी परिषदेच्या तयारीची माहिती दिली. ‘भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या संमेलनात १२५हून अधिक देशांतून एक लाखांहून अधिक पाहुणे दिल्लीत येतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही तंत्रज्ञानावर विशेष भर देतो. विशेषत: डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांशी जोडलेले तंत्रज्ञान आहे. यासंदर्भात भारताने मीडिया सेंटरमध्ये काही प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. परिषदस्थळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब आहे. या परिषदेत रिझर्व्ह बँकेचे डिजिटल चलनही उपलब्ध करून दिलेले आहे. यामुळे ज्यांचे भारतात बँक खाते नाही, त्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनाही त्यांच्या मोबाइल वॉलेटमध्ये काही पैसे उपलब्ध होतील व दिल्लीत खरेदी करण्यासाठी ते डिजिटल व्यवहार करू शकतील’, अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे’, अशी माहिती शृंगला यांनी दिली.

रशिया, चीनकडे डोळे

परिषदेच्या अखेरीस जारी होणाऱ्या संयुक्त जाहीरनाम्यात एकवाक्यता असावी, यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असले, तरी रशिया व त्याहूनही चीनची भूमिका काय असणार याकडे सदस्य राष्ट्रांचे डोळे लागले आहेत. या परिषदेतील प्रत्येक देशाला नकाराचा अधिकार असल्याने युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया व चीन जाहीरनाम्यातील मसुद्यावर कोणती भूमिका घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यापूर्वी बाली येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेतील जाहीरनामा एकमताना प्रसिद्ध व्हावा, यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे अमेरिकेसह अन्य देशांनी कौतुक केले होते.

Post Views: 126
Previous Post

विधानसभा पोटनिवडणूक निकाल: तीन जागांवर भाजप तर चार जागांवर इंडिया विजयी

Next Post

तलाठी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ‘त्या’ पोलीस बाबाचा शोध सुरु; विद्यार्थ्यांकडून घेतले ३ लाख

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
तलाठी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ‘त्या’ पोलीस बाबाचा शोध सुरु; विद्यार्थ्यांकडून घेतले ३ लाख

तलाठी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी 'त्या' पोलीस बाबाचा शोध सुरु; विद्यार्थ्यांकडून घेतले ३ लाख

ताज्या बातम्या

खुशखबर …… जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा

July 22, 2026

एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील अतिसाराचा एक रुग्ण अत्यवस्थ

July 22, 2026
बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

July 22, 2026

बार्शी तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न; तरुणावर पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल

July 22, 2026

भव्य शालेय दिंडी व विठ्ठल रुख्मिणी वेशभूषा स्पर्धा २०२६ #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0992977

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!