सांगोला – सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम सत्रातील पालक मेळावा संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड, प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख, पालक प्रतिनिधी महादेव शिंदे, संभाजी फाटे, स्मिता लेंडवे उपस्थित होत्या. प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ.रणजीत देशमुख यांनी कॉलेजमधील शैक्षणिक उपक्रम, प्रयोगशाळांची सुविधा, विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प, विविध तांत्रिक स्पर्धांमधील यश तसेच प्लेसमेंट व करिअर मार्गदर्शन उपक्रमांची माहिती दिली. मनोगतात महादेव गायकवाड यांनी पालकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उमेश देशमुखे, महादेव शिंदे, संभाजी फाटे यांनी मनोगत व्यक्त केले. या पालक मेळाव्यामुळे पालक व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक दृढ होत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप बावचे यांनी केले.
Post Views: 5