Saturday, August 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यमाई तलावालगतची शासनाची जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडे हस्तांतरणास शासनाची मंजुरी

तरुण भारतbyतरुण भारत
June 17, 2026
in west maharashtra
0
यमाई तलावालगतची शासनाची जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडे हस्तांतरणास शासनाची मंजुरी
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – पंढरपूर शहरातील गट क्रमांक १६१ मधील यमाई तलावालगत असलेली सुमारे ३ हेक्टर १२ आर क्षेत्रफळाची शासन मालकीची जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास शासनाने विविध अटी व शर्तींसह दि. १६ जून रोजी मंजुरी दिल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
याबाबत दि. २८ एप्रिल रोजी मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदर जमीन मंदिर समितीकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी तात्काळ शासनास प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त, पुणे यांच्या मार्फत दि. ७ मे रोजी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सदर जागा मंदिर समितीस प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक पर्यटन (सहल) केंद्र तसेच गोमाता जतन व संवर्धन केंद्र उभारण्याचा मानस आहे. या प्रकल्पासाठी मंदिर समितीने प्रारूप आराखडा तयार केला असून, सदर काम मंदिर समितीच्या निधीतून करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत या जागेवर मंदिर समितीची गोशाळा कार्यरत असून, येथे सुमारे २५० लहान-मोठ्या देशी गाई व वासरांचे संगोपन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले जात आहे. गोवंशासाठी स्वच्छ व प्रशस्त निवारा, नियमित पशुवैद्यकीय तपासणी, पौष्टिक चारा तसेच पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. गोशाळेतून प्राप्त होणाऱ्या दुधाचा उपयोग श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्योपचार व धार्मिक विधींसाठी केला जातो. याशिवाय गोसेवेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व जपण्याचे आणि भाविकांमध्ये गोसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे कार्यही मंदिर समितीमार्फत केले जाणार आहे.
यमाई तलावालगतची ही जागा मंदिर समितीकडे हस्तांतरित झाल्यानंतर येथे पर्यावरणपूरक व अत्याधुनिक सुविधांनी युक्त आदर्श ‘गोमाता जतन व संवर्धन केंद्र’ विकसित करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये देशी गोवंश संवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, चारा विकास, गोआधारित उपक्रम तसेच भाविकांना गोसेवेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल अशा विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे पंढरपूरमध्ये धार्मिक पर्यटनासोबतच गोसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे.
दि. २८ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीस ऑनलाइन पद्धतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, मंदिर समिती सदस्य ह.भ.प. भास्करगिरी महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच प्रत्यक्ष उपस्थितीत मंदिर समिती सदस्या ॲड. माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
सदर महत्त्वपूर्ण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राजी (वहिनी) पवार, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने शतशः आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयानिमित्त आज सायंकाळी गोशाळा परिसरात गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, विभाग प्रमुख अतुल बक्षी, राजेंद्र सुभेदार, सावता हजारे, योगराज बाणेकर, शंकर मदने, यशवंत गुरव, समीर ढोबळे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Post Views: 34
Previous Post

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी

Next Post

खोटले येथील स्वामींच्या पालखीचे वटवृक्ष मंदीरात स्वागत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
खोटले येथील स्वामींच्या पालखीचे वटवृक्ष मंदीरात स्वागत

खोटले येथील स्वामींच्या पालखीचे वटवृक्ष मंदीरात स्वागत

ताज्या बातम्या

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

July 31, 2026
कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

July 31, 2026
राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

July 31, 2026

एका कर्मचाऱ्याच्या वर्षभरात तीन बदल्या; जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

July 31, 2026
सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

July 31, 2026
वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

July 31, 2026
शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

July 31, 2026
यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

July 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1018836

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!