सांगोला – कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ व्या स्मृती समारोह अंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी लवांडे प्रथम, संस्कृती बेहेरे द्वितीय (सांगोला विद्यामंदिर प्रशाला), स्पंदन कोळेकर तृतीय (न्यू इंग्लिश स्कूल), ईश्वरी गायकवाड चतुर्थ (फॅबटेक पब्लिक स्कूल) तर ग्रामीण स्पर्धकांमधून पाचवा क्रमांक सिद्धी लिगाडे (श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, धायटी) यांनी संपादन करत पारितोषिक मिळवले.
स्पर्धेच्या सुरुवातीला कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास परीक्षक सुनील जगताप यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सदर स्पर्धेत ४३ स्पर्धकांच्या पात्रता फेरीतून ९ स्पर्धक निवडून त्यांचे अंतिम परीक्षण सागर विश्वासे, सुनील जगताप (पंढरपूर), निखिल बडवे (सोलापूर), पुष्पलता मिसाळ, नितीन गवळी (सांगोला), ज्ञानेश्वर डोंगरे (चोपडी) या तज्ञपरीक्षकांमार्फत करण्यात आले. यशस्वी स्पर्धकांचा प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन मार्गदर्शक शिक्षकांसह सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सदस्या शीलाकाकी झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक जगन्नाथ माने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य विश्वेश झपके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासाहेब नरुटे, शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चारुदत्त जगताप, सत्कार निवेदन उन्मेश आटपाडीकर, सूत्रसंचालन आशुतोष नष्टे तर आभार काकासाहेब नरुटे यांनी मानले.
Post Views: 5