बार्शी – दि. २८ सप्टेंबर रोजी भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने राष्ट्रनेता व राष्ट्रपिता हा अभियान बार्शी तालुक्यात सोलापूर रोड पारधी कॅम्प पारधी समाजासाठी विविध शासकीय जात प्रमाणपत्र दाखले देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर भटके विमुक्त विकास परिषदचे संघटन मंत्री राहुलजी चव्हाण व प्रदेशाध्यक्ष उद्धवजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राष्ट्रनेता व राष्ट्रपिता हे उपक्रम राज्यभर राबविण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन, निवासी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे गणेश सोनटक्के, तहसीलदार श्री. एफ. आर. शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराचे उद्घाटन रा. स्व. संघाचे सोलापूर जिल्हा कार्यवाह श्री. ऋषिकेशजी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भटके विमुक्त विकास परिषदचे जिल्हा अशासकीय सदस्य व अभियान प्रमुख सुनील पवार, बार्शी तालुका संयोजक पद्मजाताई काळे, सुवर्णाताई पवार आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी ़एकूण ३७१ लोकांचे लाभार्थ्यांचे विविध प्रकारचे अर्ज भरुन घेण्यात आले.