
सोलापूर – विश्व हिंदू परिषद सोलापूर जिल्हा सामाजिक समरसता आयामच्या वतीने,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त रविवार दि.३१ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास चार हुतात्मा पुतळ्याजवळील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांताध्यक्ष प्रा.गजानन धरणे व जिल्हाध्यक्ष विष्णू मोंढे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद सोलापूर विभागाचे सहमंत्री संजयकुमार जमादार,जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे,जिल्हा उपाध्यक्ष ॲड.केदार पाटील,जिल्हा सहमंत्री विष्णू जगताप, सामाजिक समरसता आयामचे जिल्हा संयोजक चंद्रकांत कुलकर्णी, नैतिक मूल्य शिक्षणचे जिल्हा संयोजक चन्नबसवेश्वर सोलापूरे व जिल्हा सहसंयोजक रमेश बेंबळकर उपस्थित होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले,एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले.त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकामे केली असल्याची माहिती याप्रसंगी उपस्थित प्रतिनिधीशी बोलताना विश्व हिंदू परिषद सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे यांनी दिली.
Post Views: 11