
माढा :- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माढा शहराध्यक्षपदी अनिकेत चवरे यांची तर उपाध्यक्षपदी शिवरंग गोटे यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते यांना निवडीचे पत्र देण्यात आले. अनिकेत चवरे हे यापूर्वी माढा शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष होते. ते रणजितसिंह शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांना निवडीचे पत्र कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते देताना भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, समाज कल्याण चे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, माढा नगरपंचायतीच्या गटनेत्या संजीवनी भांगे, नगरसेवक राजू गोटे, नगरसेवक दिनेश गाडेकर, यांनी अभिनंदन केले.
Post Views: 8