पंढरपूर – उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज नाही. पक्षाने जी भूमिकाघेतली आहे त्याप्रमाणे आपण काम करणार आहोत अशी प्रतिक्रिया माजीआमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
विधानपरिषदेच्या सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्यसंस्था मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी श्री.परिचारक यांनी प्रयत्न केलेलेहोते. मात्र भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्या पार्श्वभूमीवर येथील पत्रकारांनी माजी आमदार परिचारकांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना परिचारकांनी दिलखुलासपणे संवाद साधत उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज नाही. पक्षाने जी भूमिका घेतली आहे त्याप्रमाणे आपण काम करणार आहोत असे सांगितले.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले, आपण २०१४ पासून भाजपचे काम करीत आहोत. भाजपची ताकद वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले आहेत. या पार्श्वभूमीवर सन २०१९ साली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार राजेंद्र राऊत यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. माझ्यामुळे दोघांचा भाजपमध्ये प्रवेश झाला अशी देखील आठवण आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितली.
आपण निश्चितच जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी काम केले होते. याची दखल घेऊन भाजपने २०१६ मध्ये मला विधान परिषदेवर उमेदवारी दिली होती. यामुळे या निवडणुकीत आपण विजयी झालो होतो. यानंतर २०१९ साली भाजपने पुन्हा आपणाला संधी दिली होती. यामुळे पक्ष संधी देत असतो; मात्र यासाठी धीर धरावा लागतो.
पक्षाची भूमिका ही आपल्याला मान्यआहे. काहीवेळा थांबावे लागते. सगळेच पदे मला असे चालत नाही हे राजकारण आहे. पक्षापुढे मोठ्या अडचणी असतात. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते भविष्यकाळ पाहून निर्णय घेत असतात. पुढील काळातही आपल्याला या पेक्षा चांगली संधी मिळेल असा विश्वास असल्देयाचे खील माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
——————-
चौकट : ( आपल्यामुळेच निंबाळकर आणि राऊतांचा भाजपात प्रवेश )
सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी २०१९ साली माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर तसेच २०१९ मध्ये बार्शीचे राजेंद्र राऊत यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. बार्शी येथे तत्कालीन मंत्री चंद्रकांत दादापाटील यांच्या उपस्थितीत राऊत यांना प्रवेश देण्यात आला. माझ्यामुळे निंबाळकर व राजेंद्र राऊत यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला असल्याचे परिचारक यांनी सांगितले.
Post Views: 3