Friday, July 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आयएएस घोलप यांच्या पुस्तकांतून संघर्षातून ध्येय गाठण्याची व चांगले कार्य करण्याची मिळेल प्रेरणा – नागराज मंजुळे

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
आयएएस घोलप यांच्या पुस्तकांतून संघर्षातून ध्येय गाठण्याची व चांगले कार्य करण्याची मिळेल प्रेरणा – नागराज मंजुळे
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – आयएएस रमेश घोलप यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळवले. प्रशासकीय सेवाकाळात दुर्गम भागात पोहचून वंचितांना त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले. त्यामुळेच रमेश घोलप यांच्यासारखी समाजाची चिंता, काळजी वाहणारी माणसं समाजाला भारी वाटतात. त्यांच्या जीवनप्रवासावरील पुस्तकांतून युवकांना संघर्षातून ही ध्येय गाठण्याची व समाजासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.

आयएएस रमेश घोलप लिखीत ‘इथे थांबणे नाही’ या जीवन प्रवासाच्या सुधारित आवृत्तीचा तसेच घोलप यांचा संघर्ष, सेवा आणि जाणिवांचा प्रवास यांचे प्रतिबिंब असणाऱ्या उमेद प्रतिष्ठान निर्मित ‘वाट रेखाटणारी पावलं (ग्राऊंडेड ग्लोरी) या मराठी व इंग्रजी अशा द्विभाषिक कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. 

 मंजुळे पुढे म्हणाले, जगात करिअरच्या अनेक संधी आहेत. त्यातून आपल्या क्षमतेनुसार ध्येय ठरवून क्षेत्र निवडले पाहिजे. जे आवडते तेच करा. इतरांची कॉपी करु नका. व्यवसाय छोटा असो की मोठा त्यातूनही यशस्वी होता येते फक्त जिद्द हवी असे सांगितले.

आमदार दिलीप सोपल म्हणाले, कुठेच थांबायचं नाही हे मनातून असावं लागतं. घोलप यांनी संघर्ष केला. त्यामुळे त्यांना यश मिळाले. झारखंडसारख्या राज्यात त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली, असे गौरवोद्गार काढले. राज्यातील भोंदूबाबाच्या प्रकरणाचा संदर्भ देत सोपल यांनी ज्ञानोबा, तुकोबांच्या महाराष्ट्रात लोकांमध्ये असुरक्षिततेची, अस्वस्थतेची भावना का वाढतेय? यावर एखाद्या चित्रपट काढा, अशी सूचनावजा विनंती मंजुळे यांना केली. 

 बीव्हीजीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड म्हणाले, जग सध्या पैशाच्या मागे धावत आहे. पण इतिहासाने पैशाच्या मागे धावणाऱ्या नव्हे तर प्रभावशील व्यक्तिमत्वांची दखल घेतली आहे. रमेश घोलप हा संवेदना, माणुसकी जपणारा माणूस आहे. त्यांनी लोकांच्या वेदना समजून घेत काम केले. युवकांना उद्देशून ते म्हणाले, जे करायचे ते सर्वाेत्तम करा. इथे थांबायचे नाही पण जायचं कुठं हे ही ठरवा. ते गाठल्याशिवाय थांबायचं नाही याचा ध्यास घ्या. 

सत्काराला उत्तर देताना आयएएस रमेश घोलप म्हणाले, संकटांना नकारात्मकतेने पाहू नका तर संधी माना. परिस्थिती हलाखीची असेल तर समजून जा की तुमचा जन्म रेकॉर्ड तोडण्यासाठी झाला आहे. गुणवत्ता व कष्ट करण्याची तयारी असेल तर हलाखीची परिस्थिती आडवी येत नाही हे त्यांनी ठासून सांगितले. दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाने आयुष्याचे सर्कल पूर्ण झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

प्रकाशक मनोज अंबिके यांनी दर्जेदार पुस्तक निर्मीतीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तहसीलदार धीरज मांजरे यांनी दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातून चांगला आदर्श युवकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात डॉ.बी.वाय.यादव म्हणाले, जन्मभूमीशी नाते ठेवणारी व्यक्ती म्हणून आम्ही घोलप यांच्याकडे पाहतो, अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविकात उमेश घोलप यांनी उमेद प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. 

यावेळी विचारपीठावर सभापती विजय गरड, प्रा. तानाजी ठोंबरे, राजा माने, विमल घोलप, रुपाली घोलप, नंदकुमार जगदाळे, पी टी पाटील, प्राचार्य डॉ दीपक गुंड, बीडीओ अमोल ताकभाते, शिवदास नलावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामचंद्र इकारे यांनी केले. उमेद प्रतिष्ठानचे दिनेश घोलप, निलेश झालटे, मयूर गलांडे, खंडू डोईफोडे, बाळासाहेब ढेंबरे आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 190
Previous Post

अघोरी पूजा व नरबळी व्हिडिओबाबत पोलिसांनी केली चौकशी

Next Post

रक्षक बनला भक्षक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रक्षक बनला भक्षक

ताज्या बातम्या

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

July 2, 2026
डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेवर ‘आदर्श शाळा’ पुरस्काराची मोहोर गुणवत्तेचा गौरव 

July 2, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

July 2, 2026

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन सन्मान योजनेंतर्गत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

July 2, 2026
हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0955940

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!