सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ सोहळ्याच्या निमित्त सेटलमेंट परिसरातील ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळ संचालित ईच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळ आणि ‘ईच्छा भगवंताची परिवार’ यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हे शिबिर उत्साहात संपन्न झाले. नागरिकांच्या आरोग्याची वेळेवर तपासणी व्हावी, आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान व्हावे आणि सर्वसामान्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पौर्णिमा हिरेमठ यांनी महिलांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सतीश आदीमनी. यांनी डोळ्यांशी संबंधित विविध आजारांची तपासणी केली. तसेच जनरल फिजिशियन डॉ. कुशल जैन यांनी नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा नगरसेवक किसन भाऊ जाधव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासोबतच ‘सेवा संकल्प’ ही कार्यसंस्कृती समाजासमोर ठेवली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर सुरू असलेल्या सेवा संकल्प सोहळ्यात सहभागी होत नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचविणे हीच खरी लोकसेवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी तसेच सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, भाजपा शहराध्यक्षा सौ. रोहिणी ताई तडवळकर,नगरसेविका सौ. अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड,नगरसेविका सौ. चैत्रालीताई शिवराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून सेवा व जनकल्याणाचे विविध उपक्रम राबविले जात असल्याचेही जाधव यांनी सांगितले. मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, ॲड. अनिल दादा जाधव आणि युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी कैकाडी समाजाचे सचिव सुरजकुमार संभाजी गायकवाड रत्नापूरकर, मंडळाचे उत्सव अध्यक्ष उत्कर्ष विनोद गायकवाड तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
Post Views: 6