सांगोला – माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला संचलित उत्कर्ष पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थाध्यक्षा निलिमा कुलकर्णी, पदाधिकारी मनीषा भोसेकर, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका व शिक्षिका, माध्यमिकचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रशांत भोसले, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विश्रांती बनसोडे, उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका संध्या शास्त्री, ज्यु.कॉलेजच्या प्राचार्या वर्षा कुलकर्णी, पर्यवेक्षिका सुनयना मजगे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी इ.९ वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक अजय गुसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध संचलन सादर केले. पूर्व प्राथमिकच्या शिक्षिका शालन गयाळी व प्राथमिकच्या प्राजक्ता घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कवायत सादर केली. यावेळी इ.४ थी मधील श्रमिक दिन २०२६ रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. पूर्व प्राथमिकच्या शिक्षिका शकीला खतीब व विद्या म्हेत्रे, प्राथमिकच्या शिक्षिका शुभांगी कवठेकर व पूनम भाकरे तसेच माध्यमिकच्या शिक्षिका रेश्मा सर्वगोड, प्राजक्ता पैलवान, सुवर्णा सपताळ, निशा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संचित राऊत यांनी केले.
चौकट-
गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
विद्यालयातील इयत्ता चौथी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी श्रीहरी दिपक भाकरे व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी राज मोहन शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.