Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोकमंगल कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक एक नोव्हेंबर रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नवीन शिक्षण प्रणालीनुसार कृषी अभ्यासक्रमात दीक्षारंभ या विषयाचा समावेश करण्यात आला असून याद्वारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची ओळख, प्रक्षेत्र भेटी, मार्गदर्शन व्याख्याने आणि औद्योगिक संस्थांना भेटी इत्यादी उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात दीक्षारंभ तथा विद्यार्थी स्वागत समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला होता.

सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा बँक ऑफ बरोडा, वडाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक  श्री. सुमित कृपाळ हे लाभले होते. दीक्षारंभ कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, दीक्षारंभ विषयप्रमुख प्रा. नवनाथ गोसावी, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सुजाता चौगुले आणि प्रथम वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधींच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मूर्ती पूजन करून करण्यात आली.

सदरील स्वागत समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. राजनंदिनी कात्रे हिने मांडले. उपस्थित विद्यार्थ्यांना निखिल माळी याने प्रमुख अतिथी सुमित कृपाळ यांची ओळख करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या हस्ते सुमित कृपाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बॅग देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुमित कृपाळ यांनी आपल्या जडणघडणीमध्ये लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा अतुलनीय वाटा असल्याचे विशेष नमूद केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सर्व सोयीसुविधांचा पुरेपूर वापर करून आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, बँकिंग पदव्युत्तर पदवी शिक्षण इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी याकरिता मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना एकका च्या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. यंदाच्या वर्षीचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार अंतिम वर्षातील विद्यार्थी विक्रम घोडके आणि उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार कु. गायत्री जाधव आणि कु. वैष्णवी जाधव यांना विभागून देण्यात आला.

रासेयो विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक पृथ्वीराज इनामदार याने पटकाविले. गायत्री जाधव हिने आपल्या मनोगता मधुन राष्ट्रीय सेवा योजना एकक तथा महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे विशेष आभार व्यक्त केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
             

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना  स्वागत समारंभाचा मुख्य हेतू सविस्तरपणे सांगितला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असून त्याकरिता अभ्यासासमवेत, कला, क्रीडा, मूल्यशिक्षण आणि सामाजिक क्षेत्र इत्यादी बाबतीमध्ये देखील महाविद्यालय विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. श्री. सुमित कृपाळ या सारख्या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नियमित स्वरूपात ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवावी हा मौलिक सल्ला त्यांनी दिला. औपचारिक कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी विलास पांढरे याने केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता बागुल आणि कु. वैष्णवी घोळवे यांनी केले.
          दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना दीक्षारंभ विषय प्रमुख प्रा. नवनाथ गोसावी  यांनी चलचित्रफितीच्या माध्यमातून कृषी पदवी शिक्षण तथा महाविद्यालयाचे विविधांगी उपक्रम याबाबत जागृत केले. यानंतर विद्यार्थ्याकरिता सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांनी सदरील कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद लुटला. सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवट हा प्रा. नवनाथ गोसावी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सदरील कार्यक्रमाचे स्तुत्य आयोजन व यशस्वी संपन्नतेसाठी परिश्रम घेतल्यामुळे त्यांनी याप्रसंगी त्यांचे विशेष कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल माळी, पार्थ आदलिंगे, कु. श्रुती वीर आणि कु. माधवी झेंडगे यांनी केले. कु. वैष्णवी घोळवे हिने उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला. स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. दीक्षारंभ कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वी संपन्नतेसाठी प्रा. नवनाथ गोसावी, डॉ. परशुराम कांबळे आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्वच वर्षातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. 

Post Views: 45
Previous Post

पंडित कांबळे यांच्या खुटकंदील या कथा संपादनास स्वदेशी भारत साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर 

Next Post

सोलापूर जिल्ह्यात वाढत आहे अजगरांचा अधिवास! धोत्रीपाठोपाठ आता अक्कलकोट मध्येही अजगर आढळला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर जिल्ह्यात वाढत आहे अजगरांचा अधिवास! धोत्रीपाठोपाठ आता अक्कलकोट मध्येही अजगर आढळला

ताज्या बातम्या

हमीभावाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी ; सोयगाव

April 18, 2026

सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्ये निरज पाटील प्रथम

April 18, 2026

सोलापूरच्या रणरागिणींची विजयी घोडदौड ; कोल्हापूर आणि पुण्यावर दिमाखदार विजय

April 18, 2026

कर्णधार संदेश गाडेचे शानदार शतक; श्रवण माळी ‘ मॅन ऑफ द मॅच ‘

April 18, 2026

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

परतवाडीच्या प्रकरणात पोलिसाच निघाले आरोपीचे मित्र

April 18, 2026

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगगिरी

April 18, 2026

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानकडून मटके वाटप उपक्रम

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816736

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697