सोलापूर – राष्ट्रनिर्मितीमध्ये अण्णाभाऊंचे साहित्य वरदान ठरत आहे. समाज व सामाजिक जाणीवा अण्णाभाऊंच्या साहित्याने निर्माण केल्या. त्यांच्या अनेक कादंबरीतून कष्टकऱ्यांचे दुःख व वेदना मांडल्या आहेत. बौद्धिक कौशल्य, सहज सुलभ व हृदयाला भिडणारी भाषा हे त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. असे मत, रशियन स्टेट मॉस्को येथील इंदिरा गाजीएवा यांनी ऑनलाइन मोडद्वारे विचार व्यक्त केले.
त्या वसुंधरा कला महाविद्यालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्यारत्न डॉ. अण्णा भाऊ साठे: जीवन व कार्य’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अतुल लकडे, प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे, प्रा. डॉ. अशोक शिंदे, डॉ. मारोती घंटेवाड, शिवाजी काशीद इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र सरकार आणि आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अण्णाभाऊंचा पुतळा रशियात बसवण्यात आला. रशिया व भारत यांच्यातील दुवा अण्णाभाऊंचे साहित्य ठरत आहे. अण्णाभाऊचे अनेक अप्रकाशित साहित्य आहे , त्याचा शोध व संशोधन होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्येही अण्णाभाऊंच्या साहित्याने स्फुल्लिंग निर्माण करण्याचे काम केले आहे. अण्णाभाऊचे साहित्य मॅक्झिम गॉर्कीच्या साहित्याशी साम्य करणारे आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष *प्रा. डॉ. अतुल लकडे* म्हणाले की, जागतिक पातळीवर अण्णाभाऊंचे साहित्य महत्त्वाचे असून या साहित्याने जग बदलले व पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण केला. ज्ञान महत्त्वाचे असून पदवी महत्त्वाची नाही हे अण्णाभाऊच्या साहित्याने अधोरेखित केले. अशी भूमिका मांडली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला.
*प्रथम सत्र*: ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या साहित्यातील मानवतावाद’ या विषयावर जे.एन.यू. दिल्ली येथील कायदा आणि प्रशासन विभाग प्रमुख मा. प्रा. डॉ. बी. एस. वाघमारे यांनी मार्गदर्शक करताना म्हणाले की, अण्णांच्या साहित्यातून आशयद्रवयुक्त कलाकृती निर्माण झाली. मात्र मराठी सारस्वताने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. प्रस्तापितांच्या जीवनवादातून जीवनमूल्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना मॅक्झिम गॉर्की आणि वर्डसवर्थची उपमा दिली जाते. सामाजिक शास्त्राचे अधिष्ठाता प्रा. डॉ. महेश खरात यांनी अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या आटोपशीर व रितीवादी आहेत. त्यांच्या साहित्यात रितीवादाबरोबर जीवनवादी विचार मांडले आहेत. तर सत्राचे अध्यक्षपद मा.प्रा.डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याच्या धबधब्यात सामाजिक जाणीवा निर्माण होत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले.
*द्वितीय सत्र*: ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे विविधांगी चिंतन’ या विषयावर प्रा. डॉ. राज ताडेराव यांनी उपेक्षितांचा इतिहास मांडून त्यांना नायक म्हणून उभे केले असा विचार मांडला. जे. एन.यु.चे सेंटर फॉर रशियन स्टडीज प्रा. डॉ. सोनू सैनी, पेरूतील भारतीय राजदूत विश्वास सपकाळ यांनी ऑनलाइन मोडद्वारे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी बोलताना अण्णाभाऊसाठेनी सौंदर्याच्या लावणीचा पॅटर्न बदलून वीर रसाची लावणी महाराष्ट्राला दिली.
*तृतीय सत्र*: ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान’ या विषयावर मा.प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी मार्गदर्शन केले तर सत्राचे अध्यक्षपद मा.प्रा.डॉ. भगवान वाघमारे भूषविले.
——
Post Views: 3