Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पत्रकाराला बंदुकीचा धाक; बातम्या बंद कर, नाहीतर उडवून टाकू

तरुण भारतbyतरुण भारत
June 4, 2026
in crime
0
पत्रकाराला बंदुकीचा धाक; बातम्या बंद कर, नाहीतर उडवून टाकू
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – शहरातील पत्रकारितेच्या क्षेत्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक तथा पत्रकार संतोष विष्णु भुतेकर यांना घरासमोर अडवून दोन अज्ञात इसमांनी बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे लावण्यात आली आहेत.

पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार, २ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास संतोष भुतेकर हे आपल्या निवासस्थानाजवळील कार्यालयातील काम आटोपून पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर गेले होते. मयुरी रेसिडेन्सी परिसरातील घरासमोरील रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे असताना त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात इसम आले. फिर्यादीनुसार, दोघांनी भुतेकर यांची कॉलर पकडून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. तू पत्रकार आहेस, जास्त शहाणा होऊ नकोस. तू सतत गुटखा प्रकरणांच्या बातम्या प्रसिद्ध करतोस, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, असे म्हणत एका आरोपीने त्यांच्या पाठीला बंदुकीसारखी वस्तू लावली आणि याच बंदुकीने तुला उडवून टाकू, अशी धमकी दिली.

यावेळी भुतेकर यांच्या हातातील पाळीव कुत्रा आरोपींच्या दिशेने धावून गेल्याने आरोपी घाबरले. त्यानंतर एका आरोपीने बंदुकीच्या मागील भागाने भुतेकर यांच्या डाव्या हातावर प्रहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तुला बघून घेतो, अशी धमकी देत दोघे घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर भुतेकर यांनी तातडीने चंदनझिरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी अधिकृत तक्रार दाखल केली. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२) (मारहाण), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), ३(५) (सामूहिक कृत्य) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ आणि महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत महिपतराव कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पत्रकाराला लक्ष्य करून धमकी देण्यात आल्याने पत्रकार संघटना, सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पत्रकारांवर हल्ले करून सत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याचा कठोर धडा शिकवावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. शहरातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Post Views: 42
Previous Post

प्राचार्य म्हमाणे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम थाटात संपन्न

Next Post

हिंदकेसरी महेंद्र गायकवाडचा सांगोल्यात सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हिंदकेसरी महेंद्र गायकवाडचा सांगोल्यात सन्मान

हिंदकेसरी महेंद्र गायकवाडचा सांगोल्यात सन्मान

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1168177

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!