बार्शी – एमआयटी शाळेच्या इयत्ता ६ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी विद्या प्रतिष्ठानचे शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र (AI Center), बारामती येथे शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याचे विविध क्षेत्रांतील उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावेत, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता.
या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्रातील विविध तंत्रज्ञानविषयक उपक्रमांची माहिती घेतली. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना, दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच शिक्षण, शेती आणि इतर क्षेत्रांमधील त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या प्राचार्या रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी जिज्ञासू, सर्जनशील आणि तंत्रज्ञानसाक्षर बनणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अशा क्षेत्रभेटींमधून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवाचा उपयोग आपल्या ज्ञानवृद्धीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी कुतूहल वाढले. ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली.
Post Views: 5