जालना : ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना शहरातील गांधी चमन येथे श्री. दीपक रणनवरे हे आमरण उपोषणास बसले आहेत. आज सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन श्री. दीपक रणनवरे यांची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या सविस्तरपणे समजून घेतल्या. समाजातील मुला-मुलींना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र सुरू करून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे श्री. रणनवरे यांनी खासदारांना सांगितले.
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उपोषणकर्ते श्री. दीपक रणनवरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित मागण्यांबाबत शासनस्तरावर योग्य ती दखल घेण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली.
समाजाच्या रास्त मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा काढावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी राजेंद्र राख,बदरभाई चाऊस,संजय इंगळे, संजय मुथा,सुनील चौधरी, अशोक उबाळे,राजेंद्र गोरे,राजाभाऊ कुलकर्णी,रऊफ परसूवाले,कृष्णा पा.पडूळ,राम पा.सिरसाठ,ज्ञानेश्वर डुकरे,नारायण वाढेकर,सोपान तिरुखे, ज्ञानदेव इंगोले अर्जुन भांदरगे,योगीताताई धांडगे, रघुवीर गुढे, सुरज यलगंटवार,दिनेश सुराणा,चंद्रकांत रत्नपारखी,भाऊसाहेब लकडे,राम गव्हाणे,भागवत घाटे,विक्रम चव्हाण,गणेश एखंडे,दिग्विजय धांडगे,व ब्राह्मण समाजातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















