सांगोला – श्री चौंडेश्वरी पतंजली महिला योगवर्ग, कोष्टी गल्ली, सांगोला यांच्या वतीने कांदेनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कांदे खेव, कांद्याची भजी व गोड मिठाई यांचा आस्वाद सर्वांनी घेतला. उपस्थित महिलांनी विविध पारंपरिक खेळ खेळून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे नियोजन योगशिक्षिका मंगल लाटणे यांनी केले. आषाढ शुद्ध नवमीला विशेष महत्त्व असून या दिवशी कांद्याचे सर्व पदार्थ करून खाल्ले जातात, त्यामुळे या नवमीला कांदेनवमी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असल्याने धार्मिक परंपरेनुसार पुढील चार महिने कांदा-लसूण खाणे अनेकजण टाळतात.