करकंब : श्री.चौंडेश्वरी मंदिर करकंब येथे चैत्र पौर्णिमे निमित्त करकंब कोष्टी समाज बांधव, भगिनींच्या वतीने श्री.चौंडेश्वरी मातेची पूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.श्री. चौंडेश्वरी मातेची पूजा व आरती साधना राजेंद्र टकले,उर्मिला राजेंद्र करपे,चैताली चंद्रकांत वास्ते,निर्मला चंद्रकांत फासे, स्वप्नाली प्रफुल्ल शिलवंत या कोष्टी समाज भगिनींच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी या भगिनींच्या चेहऱ्यावर पूजा व आरतीचा मान मिळाल्याबद्दल समाधान व आनंद दिसून येत होता.या मंगलमय प्रसंगी वरूणराजाने हजेरी लावल्याने श्री.चौंडेश्वरी मातेने आपणास आशीर्वादच दिल्याची भावना प्रत्येक समाज बांधव,भगिनींच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.
याप्रसंगी मिष्ठान्न महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यापुढे प्रत्येक पौर्णिमेस पूजा व महारतीचे आयोजन करण्यात येणार आहे.त्याप्रसंगी कोष्टी समाज बांधव, भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले.यावेळी चंद्रकांत रसाळ,जयंत टकले,प्रभाकर रसाळ, संजीवकुमार म्हेत्रे,संजय दुधाणे जयंत फासे,गणेश दुधाणे,यश टकले,ज्ञानेश्वर दुधाणे,विजय दुधाणे ,गुरुप्रसाद दुधाणे,आशा टकले,राधा कवडे,अनुपमा दुधाणे,अंजली फासे, उषा म्हेत्रे,मंगल टकले,कोष्टी समाज बांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.















