सांगोला – फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, सांगोला येथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हान्स्ड डेटाबेस कॉन्सेप्ट या विषयावर प्रा.मोहसीन शेख यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक डेटाबेस तंत्रज्ञानातील डेटा वेअरहाऊस, डेटा लेक, डेटा मायनिंग, बिग डेटा, मोंगोडीबी आणि डायनॅमोडीबी या विविध संकल्पनांची माहिती दिली. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.दिपाली मोरे, सूत्रसंचालन प्रा.चैताली जाधव व यशस्वी करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 7