‘भगवान महावीरांचा जन्म मानव जातीसाठी उद्बोधक आणि प्रेरणादायी होय. ज्यांनी अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अचौर्य, अपरिग्रह अशा महान तत्वांचा प्रसार व प्रचार केला, ‘असे प्रतिपादन परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांनी केले.
बलिदान चौक येथील जैन स्थानकात आयोजित अक्षय चातुर्मासात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, भगवान महावीर यांचा जन्म राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला. त्यांचे जन्मनाव वर्धमान असे ठेवले गेले. भगवान महावीर शांत, गंभीर, भावनायुक्त, आदर्श प्रतिबिंबित, यथार्थ चरित्राचे धनी होते. आदर्श आणि यथार्थ यांचा उत्तम समन्वय म्हणजे भगवान महावीर. महावीरांची जीवनशैली आणि त्यांची वाणी समाजाला प्रेरणादायी ठरली.
भगवान महावीर संकल्प आणि विकल्पाच्या प्रचंड लहरी रहित, सौम्य, एवम संपूर्ण जगाला प्रतिबिंबित करण्याची योग्यता प्राप्त, चित्त सरोवर युक्त होते. लोक आणि अलोक त्यांच्यात पूर्णरित्या सामावलेले होते.अर्जुन माळी, गौतम, श्रेणीक अशा अनेकांच्या जीवनात मतपरिवर्तन करून जीवनाला उत्तम दिशा त्यांनी दिली. महावीरता म्हणजे काय हे त्यांनी अनेक उदाहरणांवरून स्पष्ट केले.
मृत्यू या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, जीवन जगणे ही एक कला आहे.जीवनातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक स्थिती सहजतेने जो स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेऊ शकतो. तोच मरणाचा देखील आनंद घेऊ शकतो. पंडित मरण, सल्लेखना मरण, संथारा हे ही त्यांनी स्पष्ट करून सांगितले.
Post Views: 9