सोलापूर – मातोश्री सिद्धवाबाई संस्कृतिक भवन हत्तुरे वस्ती विमान स्थळ समोर सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधु- वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुमारे 250 वधू -वर व पालक यांनी याचा लाभ घेतला.
प्रारंभी शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेची पूजा उदयोजक शंकर राव लिंगे – अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र प्रा.शिवानंद गोगाव अध्यक्ष – जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक लिंगायत महासभा – प्रदेश कार्याध्यक्ष – विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना उदयोजक शंकरराव लिंगे म्हणाले विश्वगुरू बसवण्णा यांनी आपणांस परिपूर्ण असा लिंगायत धर्म दिला असून लिंगायत धर्म हा अंधश्रध्दा मानत नसून वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्व देतो त्यानुसार लग्न जुळविण्यासाठी पत्रिका ,जन्मकुंडली याला थारा न देता वैज्ञानिक दृष्टिकोनातून लग्न जुळवावित. महात्मा बसवण्णा यांच्या काळात सर्वत्र अज्ञान, अंधकार, अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती, अंधश्रध्दा, जातीवाद यांचा हाहाकार माजला होता. बसवण्णांनी कुडलसंगम येथील ईशान्य गुरू यांच्या आश्रमात वेद,पुराण,शास्त्र यांचा त्यांनी सखोल विद्याभ्यास केला. विद्या अभ्यास केल्यावर विश्वगुरू बसवण्णा यांना जाणविले की अज्ञान, अंधकार, अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती, अंधश्रध्दा ,जातीवाद यांचे समूळ नष्ट करने गरजेचे आहे. असे प्रतिपादन लिंगे यांनी केले.
मेळावा यशस्वी होण्यासाठी स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे ,कार्यवाहक प्रियांका शेगावे, सुनिल दलाल , निलेश पाटील, श्रीशैल पॅडशिंगे, निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रियांका शेगावे यांनी आभार मानले.
























