वेळापूर – भीम जयंतीनिमित्त पंचशील नगर, वेळापूर येथे आयोजित भव्य मिरवणुकीच्या प्रारंभी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथाचे पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षीताई सरतापे, सरपंच रजनीश बनसोडे, रिपाईचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, विकास धाईंजे, किरण धाईंजे, रिपाई तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, दादाराजे घाडगे, काशिनाथबापू आडत, शिवाजी बनसोडे, गोपाळआबा शिरसागर, माजी उपसरपंच जावेद मुलानी, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे, रविराज गायकवाड, विजय बनसोडे, नितीन लोंढे, राजकुमार बनसोडे, भैय्यासाहेब बाबर, प्रदीप धाईंजे, शिवाजी मोहिते, शामराव सावंत, युवराज मंडले, प्रदीप सरवदे, साहिल आतार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सतीश कांबळे, उपाध्यक्ष जीवा लोंढे, गणेश धांडोरे, शंकर लोंढे, हर्षद बनसोडे, आबा बनसोडे, आदेश मोरे, समाधान बनसोडे, अण्णा बनसोडे, शशिकांत लोंढे, दीपक माने आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडली. पंचशील नगरातील सर्व नागरिक, युवक, महिला व भीमसैनिकांच्या सहभागामुळे हा सोहळा दिमाखदार आणि संस्मरणीय ठरला.

























