सोलापूर : जनतेतून सलग निवडून येत देशाच्या पंतप्रधानपदाची सर्वाधिक काळ यशस्वी धुरा सांभाळण्याचा ऐतिहासिक विक्रम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २ तसेच उमेश कोळेकर व धरीराज रमणशेट्टी मित्र परिवाराच्या वतीने शेळगी येथील योगीनाथ मंदिरात महाआरती व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
हा कार्यक्रम आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी त्यांना अधिक सामर्थ्य प्राप्त होवो आणि भारत जगासमोर विकसित राष्ट्र म्हणून नवे आदर्श प्रस्थापित करो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, संगीताताई कोळेकर, सरस्वती उपासे, संगीता खेमाणी, श्रीदेवी वागदरे, शांता तानवडे, गौरा हविनाळ, लक्ष्मी पटणे, जगदेवी तानवडे, जगदेवी पटणे, संगीता पाटील, देविका काते, कस्तुरा नरोणे, अनु धरणे, वरनाळे, कोटीवाले, महादेवी तानवडे, मिनाक्षी अंकलगी, पुष्पा कोटीवाले, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष बाबुराव नरोणे, वीरभद्र उपासे, तानवडे स, विश्वनाथ होसाळे, उमेश कोळेकर, धरीराज रमणशेट्टी आदी उपस्थित होते.
Post Views: 22