धाराशिव – धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही देत ही निवडणूक जनतेच्या हक्कांसाठीची लढाई असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अभिवादन करून महेश देशमुख यांनी आपल्या मनोगताची सुरुवात केली. राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून विकासाभिमुख आणि जनहिताचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी ओमप्रकाश राजेंनिंबाळकर , कैलास पाटील , प्रवीण स्वामी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, पांडुरंग कुंभार, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, आशाताई भिसे, डॉ. शिवाजीराव जवळगेकर, सचिन बंडापल्ले, खलिफा कुरेशी, अप्पासाहेब शेळके, अमोल कुतवळ, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, विलास शाळू, अजहर पठाण, आयाज शेख, इस्माईल शेख, शेखर घोडके, बापू शेळके, पंकज भोसले, महेबुब पटेल, विनोद वीर, सर्फराज काझी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास महेश देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
Post Views: 3