माळशिरस : येथे जैन समाजाच्या वतीने महावीर जयंती उत्साहात व भक्ती भावात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महावीर जयंती निमित्त जैन समाजाच्या वतीने सकाळी मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शहरातून भगवान महावीरांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
सकाळी नऊ वाजता मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला .त्यानंतर दहा वाजता धर्मानुरागी दिलीपराव दोंगडे मिरजगांव यांचे प्रवचन झाले त्यानंतर भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. या कार्यक्रमाच्या वेळी प्रकाश अंबुडकर विनोद दोशी ,अभिजीत दोभाडा ,अनुप दोशी, अभयकुमार दोशी ,संतोष देशमाने, शशिकांत दोशी, सुकुमार दोशी , अनिल दोशी यासह समाजातील सर्व महिला व नागरिक उपस्थित होते.
















