धाराशिव – सोशल माध्यमांचा प्लॅटफॉर्म जितका अनेकांसाठी आवश्यक बनला आहे. तितकाच तो अनेकांची फसवणूक करून आयुष्य उध्वस्त करणारा देखील ठरत आहे. या माध्यमाच्या विविध ॲप्स असलेल्या प्लॅटफॉर्मवर घरातील सख्खे नातेवाईक, मित्र परिवार किंवा जवळचे नातेवाईक यांना न विचारणाऱ्या व्यक्ती देश आणि विदेशातील व्यक्तीशी थेट मैत्री करू लागले आहेत. ते त्याच भरलेल्या आभासी दुनियेतील हवेतच विरंगळत असतात. मात्र, फसगत झाल्यानंतर त्यांना आपले नातेवाईक आठवतात. असाच प्रकार सोलापुरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय अविवाहितेसोबत झाला असून तिची ओळख टिंडर ॲपवर धाराशिव शहरातील एका व्यक्तीशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यावेळी त्या व्यक्तीने मी विवाहित आहे पण घटस्फोटीत आहे अशी थाप मारली. त्यानंतर त्यांने तिचा विश्वास संपादन करण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करतो असे खोटे आश्वासन व वचन देवून आणि आमिष दाखवले. त्यामुळे तिने त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध जुळून आले. ती प्रेग्नेंट झाली असताना त्याने नंतर लग्न करू आता ते खाली कर असे म्हणत तिला गोळ्या खाऊ घातल्या. तिने त्याच्याशी संबंध तोडले असताना त्याने तिच्या घरच्यांना तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. तसेच तिच्या घरचे तिचे दुसरीकडे लग्न जमवीत असताना मी तिच्याशी लग्न करणार आहे माझ्या शिवाय दुसऱ्या कोणाला लग्न करू देणार नाही. शिवाय ती मला नाही भेटली तर मी आत्महत्या करीन असे म्हणत उंदरे मारायचे औषध व झोपेच्या गोळ्या खात असल्याचे व्हिडिओ बनवून तिला व तिच्या कुटुंबाला धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्याने तिच्याशी लग्न न करता केवळ खोटी आश्वासने देत वारंवार तिच्यावर हॉटेल्स, लॉज व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक व लैंगिक अत्याचार केला. हे कांड त्याने २०२१ पासून ते दि.८ मे २०२६ असे सलग ६ वर्षे केले. तो लिंग पिसाट धाराशिव शहरातील ग्रीनलँड शाळेजवळील गणेश अपार्टमेंट येथील अविनाश पाश्वनाथ गडदे हा आहे. तो विवाहित असताना आणि घटस्फोट घेतला नसताना देखील केवळ स्त्री लंपट असलेल्या व शारिरीक सुखाला चटवलेल्या नराधमाने हा प्रकार केला आहे. याप्रकरणी पिडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अविनाश गडदे याला अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.
मी सन २०१४ मध्ये सोलापूर येथे शासकीय नोकरी करीत असताना ती तिच्या आई-वडिलांसह राहत होती. सन २०२१ मध्ये तिची टिंडर ॲपवरून अविनाश पाश्वनाथ गडदे याच्याशी ओळख झाली. त्यावेळी त्याने तिला त्यांचे लग्न झाले असून त्याचा आणि त्यांच्या पत्नीचा घटस्पोट झाला असल्याचे तिला सांगितले.
गडदे याने तिला सांगितले की, तो माझ्याशी लग्न करू इच्छीतो आपण लवकरच लग्न करु असे वचन देऊन त्याने तिला भावनिकरित्या स्वत:मध्ये गुंतवून घेतले, तिचा विश्वास संपादन केल्यावर त्यांचे दैनंदीन स्वरूपात बोलणे व नेहमी भेटणे होत असे. त्या दरम्यान तो सोलापूर येथे एका अपार्टमेंटमध्ये भाडे तत्त्वावर राहात होता. एके दिवशी तो तिला तो राहत असलेल्या सोलापूर येथील अपार्टमेंटमध्ये घर दाखवण्याच्या बहाण्याने घेवून गेला. तिथे गेल्यानंतर त्याने बोलता बोलता तिच्याशी शारिरीक जवळीक साधली आणि तिने नकार देवून सुध्दा व तिने रोखण्याचा खूप प्रयत्न करून सुध्दा त्याने जबरदस्तीने तिच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्याच्या अशा वागण्याने ती खूप अस्वस्थ झाल्यामुळे ती त्याच्यावर रागावली आणि चिडली. त्यावेळी त्याने मला समजावले की, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. त्यामुळे तू टेन्शन नको घेवू आपण लवकरच लग्न करू. त्यानंतर दोन महीने तिला मासिक पाळी न आल्याने ती प्रेग्नंन्सी किटवर चेक केले असता रिझल्ट पॉझिटीव्ह आला व गर्भधारणेची बातमी कनफर्म झाली.
ती गर्भवती झाली ही बाब समजताच तिने गडदे याला सांगितले की, तु माझ्यासोबत जबरदस्ती कोणत्याही गर्भनिरोधक प्रोटेक्शन शिवाय शारिरीक संबंध केल्याने ती गरोदर राहीली. त्यावेळेस त्याने तिची समजूत काढली व तिला म्हणाला की, आपण लवकरच लग्न करूया सदरवेळी तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. सध्या आपण गर्भपात करून घेवू, आपले लग्न झाले नाही म्हणून आपल्याला हॉस्पीटलमध्ये जाता येणार नाही. असे सांगून त्याने तिचा घरीच गर्भपात केला.
सन २०२२ अखेर तिच्या आईला कर्क रोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे तिची आई ह्यात आहे तोवर तिच्या डोळयासमोर तिचे लग्न व्हावे या हेतूने तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी स्थळ शोधून तिचे लग्न जमवत असताना गडदे याने तिच्या भावाला व नातेवाईकांना धमकावण्यास सुरुवात केली व तिचे लग्न कसे जमवता ? बघतोच मी, तिच्याशी फक्त मीच लग्न करणार अशा धमक्या देवू लागला. तो तिच्याशी लग्न करणार आहे अशी आश्वासने व वचन त्याने तिच्या आईला व तिच्या कुटुंबियांना दिले. त्याच्या वचनांवर विश्वास ठेवन तिच्या घरचे पण शांत बसले. त्यानंतर सन २०२३ मध्ये ती तिच्या आईला घेवून मूळ गावी गेले व तिच्यासोबत ती तिथेच राहीले. गावी राहात असताना तिचे व गडदे याच्याशी भेटणे बंद झाले. भेटण्याचे प्रमाण कमी झाल्यावरून तो तिच्यावर संशय घेवू लागला व तिला धमकावू लागला की जर तु मला भेटली नाहीस तर मी तुझ्या ऑफीसमध्ये तुझी बदनामी करीन तुझी नोकरी घालवतो अशी भीती तो तिला घालू लागला. सन २०२४ च्या सुरुवातीस तिच्या आईला जास्त त्रास होवू लागल्याने ते तिला पुणे येथील दवाखान्यात ॲडमिट केले. तिथे देखील गडदे आला व तिच्या आईला भेटून त्याने तिला वचन दिले की, मी तुमची मुलीशी लग्न करनार आहे. त्याच्या त्या वागण्याने मी भावनिक होवून पुन्हा त्याच्याशी नेहमी सारखे बोलणे भेटणे सुरु केले. परंतू वचन देवूनही तिची आई ह्यात असेपर्यंत त्याने तिच्याशी लग्न केले नाही. लग्न कधी करणार ? अशी त्यास विचारणा केली असता या ना त्या कारणाने तो टाळाटाळ करत होता. त्यानंतर मार्च २०२४ ला तिच्या आईचे निधन झाले आणि तिची बदली मुंबई येथे झाली. ती काही दिवस पुणे व काही दिवस मुबंई असे काम करीत होती. तिला पुणे या ठिकाणी कार्यरत रहावे लागत होते. त्या दरम्यान तिथे देखील गडदे हा तिला त्याच्यासोबत राहण्यास जबरदस्ती करीत असे व त्याला भेटण्यास बोलवत असे त्याने तिच्या आईला माझ्याशी लग्न करणार आहे असे वचन दिले आहे तर तो माझ्याशी लग्न करेल या विश्वासाने ती त्याला भेटण्यास त्याच्या राहत्या घरी पुणे या ठिकाणी जात होते. त्या दरम्यान देखील तो तिच्याशी भांडण करून तिला मारहाण करून तिला धमकावून ऑफीसमध्ये तुझी बदनामी करण्याची भीती दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवत असे त्याने वारंवार तिला ब्लॅकमेल करून बेदम मारहाण करून तिच्यासोबत जबरदस्ती शारिरीक संबंध केले. तसेच तिचा गैरफायदा घेतला.
२०२४ अखेर ती पुन्हा गर्भवती असल्याचे समजले तेव्हा ती त्याला लग्न कधी करणार आहे ? असे विचारले त्यावर तो तिला म्हणाला हो करूया लग्न तु पुण्याला ये आपण आंळदीला लग्न करू असे सांगितले. त्याने तिला पुण्याला बोलवून घेतले व तेव्हा देखील तिझ्याशी लग्न केले नाही व तिची फसवणूक करून पुन्हा गर्भपात केला. या कारणावरून तिने त्याला सांगितले की, मी आता पुन्हा तुला कधीच भेटणार नाही असे सांगून ती मुंबईला परत गेली. मुंबईला परत आल्यावर देखील अविनाश पाश्र्वनाथ गडदे तिला सतत फोन करून भेटण्यास येण्यासाठी जबरदस्ती करत असे, तु आली नाहीस किंवा मला भेटली नाहीस तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देवू लागला. तसेच मेसेजेस करू लागला, उंदीर मारण्याचे औषधे, झोपेच्या गोळ्या खात असल्याचे व्हीडीओ तयार करून तिला पाठवायचा या माध्यमातून तिला
इमोशनल ब्लॅकमेल करून व धमक्या देवून तिला पुण्याला बोलावन पुन्हा जबरदस्तीने तिच्याशी
शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्याने अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी, हॉटेल लॉजिंग येथे घेवून जावून तिच्यावर जबरदस्ती करून अनैसर्गिकरित्या शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या त्रासाला कंटाळून तिने एकदा त्याला विचारले की, तु खरच माझ्याशी लग्न करणार आहेस का आणि कधी करणार आहेस ? ते मला सांग आणि खरच तुझा घटस्फोट झाला आहे का ? त्यावर तो म्हणाला खरच माझा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे तिने त्याच्याकडून त्याच्या पूर्वीच्या पत्नीचा फोन नंबर घेतला व तिला फोन करून विचारले की, तुमचा डिवोर्स झाला आहे का ? त्यावर ती म्हणाली आमचा घटस्फोट झाला नाही. ते ऐकून तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला व तिला समजले की अविनाश गडदे हा सुरवातीपासून आतापर्यंत तिची फसवणुक करत आहे. त्याने तिला त्याचा घटस्फोट झाला आहे असे खोटे सांगितले. तसेच तिच्याशी लग्न करतो असे खोटे आश्वासन व वचन देवून आमिष दाखवून तिची व तिच्या घरच्यांची घोर फसवणुक केली. तिच्यावर शारिरीक अत्याचार केले व तिचा गैरफायदा घेतला. त्यानंतर अविनाश पाश्र्वनाथ गडदे याने तिच्या ऑफीसमध्ये तिच्या नातेर्वाइंकामध्ये तिचे त्याच्याशी लग्न झाले आहे, ती त्याची बायको आहे असे खोटे सांगून तिची बदनामी करू लागला.
त्यानंतर अविनाश पाश्वनाथ गडदे याने तिला फोन करून तिच्याबद्दल अर्वाच्च भाषेत बोलून शिवीगाळ केली व तिला म्हणाला की, तु जर मला भेटली नाहीस तर मी तुमच्या पूर्ण खानदानाला समाजात कुठेही तोंड दाखवण्या लायक ठेवणार नाही, तुमची बदनामी करीन, असे बोलून त्याने तिला दादर येथील हॉटेलवर बोलवले. त्याच्या धमकी ब्लॅकमेलींग व त्रासाला कंटाळून नाईलाजाने ती त्याला भेटण्यास दादर येथील हॉटेलवर गेली तिथे देखील त्याने मला मारहाण व शिवीगाळ करून माझ्याशी जबरदस्ती अनैसर्गिक शारिरीक संभोग केला.
दि.४ मे २०२६ रोजी अविनाश गडदे याने तिला फोन केला व भेटण्यास बोलवत होता. परंतू तिने त्यास नकार दिला, त्यावर त्याने तिला धमकी दिली की, ८ तारखेला तुझ्या ऑफीसमध्ये येवून तुला फरफटत घेवून जाईन. त्याच्या या धमकीमुळे ती खूप घाबरली होती व अत्यंत मानसिक तणावात होती. तिने तिच्या भावास फोन करून हा विषय सांगितला व त्यास ८ तारखेला माझ्या ऑफीसजवळ माझ्या संरक्षणासाठी बोलावून घेतले. धमकी दिल्याप्रमाणे दि. ८ मे २०२६ रोजी अविनाश पाश्र्वनाथ गडदे हा तिच्या ऑफीसमध्ये आला. त्यावेळेस ती तिच्या भावासोबत खालीच होती. तिला तिच्या ऑफीसमधून फोन आला की, तुमचे पती अविनाश आले आहेत हे ऐकून तिला धक्का बसला. कारण त्यांचे कधी लग्न झालेच नव्हते, ती तिच्या भावासोबत ऑफीसमध्ये आली व अविनाश पाश्वनाथ गडदे याला विचारणा केली की लग्न न करता तु सर्वांना माझा पती आहेस असे का सांगतोस ? त्यावेळी त्याने तिला व तिच्या भावाला शिवीगाळ केली. तिला दमदाटी केली. तु मला भेटायला का येत नाही ? असे विचारले, त्यावर तिने त्याला सांगितले की, मला तुझ्याशी बोलायचे नाही असे म्हणत तिने भेटण्यास नकार दिला. तसेच तु इथून निघून जा, इथे तमाशा करू नको, हे माझे ऑफीस आहे असे त्यास समजावले. ते एकून त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व मला माझ्या ऑफीसमधून जबरदस्ती घेवून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या त्या बेकायदेशीर व क्रूर वागण्याने ती घाबरून खाली निघुन गेली. तिच्या भावाने देखील त्यास समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतू अविनाश गडदे याने तिच्या भावाला देखील शिवीगाळ केली. त्यामुळे सन २०२१ पासून ते दि.८ मे २०२६ पर्यत अविनाश गडदे याने तिला लग्नाचे अमिष दाखवून सन २०२१ ते २०२४ पर्यत नवीपेठ, सलगर कॉम्पलेक्स, सोलापूर येथे तिच्या सोबत जबरदस्ती शारिरीक संबध करून तिला गर्भवती केले व गर्भपात करण्यासाठी मला गोळ्या देवून तिचा गर्भपात केला. त्यानंतर कोरेगाव पार्क लेन नंबर ७, पुणे, दादर येथील हॉटेल तसेच वेगवेगळ्या हॉटेल व लॉजेसवर तिला धमक्या देवून ब्लॅकमेल करून घेवून जावून तिच्याबरोबर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती अनैसर्गिकरित्या संभोग करून मारहाण केली. तसेच तिच्या ऑफिसमध्ये तिची बदनामी केली. त्यामुळे अविनाश गडदे याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारे गडदे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३५६ (१), कलम ६९ नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Post Views: 6