Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल; बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी पोलिस कोठडी

तरुण भारतbyतरुण भारत
May 26, 2026
in crime
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिध्दनकेरी येथे शेताला रस्ता करताना शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा – सिध्दनकेरी येथे तहसिलदारच्या आदेशाने शेतामध्ये रस्ता करावयास गेलेल्या  तलाठी,मंडल अधिकारी, जे.सी.बी.चालक यांच्या अंगावर धावून येवून रस्ता कसा करतो तेच बघतो अशी धमकी देवून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विठ्ठल सिद्राम कोरे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी तथा सिध्दनकेरीचे तलाठी सुयश आलदर व मंडल अधिकारी कैलास शिंदे असे दोघेजण दि.22 मे रोजी तहसीलदार यांच्या आदेशान्वये सिध्दनकेरी येथील शेतकरी अंकुश कोरे गट नं.42 मध्ये जाणे येणेकरीता गट नं.36 व 45 या दोन्ही गटाच्या हद्दीमधून रस्ता जे सी बी च्या सहाय्याने करत असताना गट नं.36 चे खातेदार तथा आरोपी विठ्ठल सिद्राम कोरे हे त्या ठिकाणी  दुपारी 2.00 वा. आले व जे.सी.बी.चालकास तु या ठिकाणी रस्ता करावयाचा नाही असे म्हणून रस्ता करण्यास अडथळा करून जे.सी.बी.चालकास रस्ता करण्याचे काम थांबवले.यावेळी मंडल अधिकारी व तलाठी यांनी आरोपीस तुम्ही रस्ता अडवू नका,तहसीलदार यांचा लेखी आदेश आहे असे समजावून सांगत असताना त्यांच्या अंगावर धावून येवून तुम्ही रस्ता कसा करता तेच बघतो अशी धमकी देवून सरकारी कामात अडथळा आणल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान शेती ही स्थावर मालमत्ता असून उत्पादित शेतकर्‍यांचा माल नेण्यासाठी रस्त्याची गरज असल्यामुळे शासन एकीकडे रस्त्यासाठी विशेष मोहिम राबवित आहे. मात्र काही शेतकरी रस्त्यासाठी आडकाठी आणून त्यांना रोखू पहात असल्यामुळे शेतकर्‍यांमधूनवाद विवाद घडत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने नुकताच नवीन आदेश काढून शेतकर्‍यांचा रस्ता अडविल्यास त्यांचे आधार कार्ड व शासकिय योजनांचा लाभ बंद करण्यात येईल असा इशारा देवूनही शेतकरी त्याला न जुमानता मनमानी पध्दतीने वागत असल्याने याउपरही शासनाने कडक भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
————-
बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघांना चार दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढा – मंगळवेढा  शहरात बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी नाना ज्ञानेश्‍वर जगताप(कारखाना रोड) व कृष्णा महेश खटकळे (खंडोबा गल्ली) या दोघांना पोलिसांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.के.  पाटील यांच्यासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी,दि.23 रोजी सायंकाळी  5.20 वा. मंगळवेढा शहरातील एम. आय. डी. सी. परिसरात वरील आरोपी बेकायदा पिस्टल घेवून येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावून वरील दोघांना पकडून अंग झडती घेतली असता दोन पिस्टल व तीन जीवंत काडतुसे मिळून आली होती. या घटनेत 1 लाख 91 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेत वरील दोघा आरोपींना तपासिक अंमलदार तथा पोलिस उपनिरिक्षक विजय पिसे यांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे करून आरोपींनी पिस्टल कोठून आणले ते कशासाठी आणले,स्वतःसाठी आणले की दुसर्‍यासाठी आणले,जवळ बाळगण्याचा नेमका उद्देश काय? आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडले असता न्यायालयाने दि.28 मे पर्यंत आरोपीस पोलिस कोठडी सुनावली आहे.दरम्यान,मागील वर्षापूर्वीही याच परिसरात बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

Post Views: 27
Previous Post

कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंबाडची  जिल्ह्यात सुवर्ण कामगिरी

Next Post

घटस्फोट झाल्याचा बनाव करीत लग्न करण्याचे आश्वासन देत अविवाहितेवर ६ वर्ष बलात्कार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

घटस्फोट झाल्याचा बनाव करीत लग्न करण्याचे आश्वासन देत अविवाहितेवर ६ वर्ष बलात्कार 

ताज्या बातम्या

तुफान पावसाने दिल्ली विमानतळावर तारांबळ #viral #newsupdate #news

June 8, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारात दिसली अजित दादांची झलक आरोग्य कर्मचाऱ्यांना झापले #maharashtranews

June 8, 2026

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

June 8, 2026
सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

June 8, 2026

मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये तरुणाचा नशेमुळे बळी #viral #maharashtranews #marathinews

June 8, 2026

लोकमंगल को ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न #solapurnews #marathinews

June 8, 2026

इन्कमटॅक्स मध्ये नोकरीचे आमिष दाखवत सहा जणांना सव्वा पाच लाखांचा गंडा घातला #marathinews

June 8, 2026

पावसाचे पाणी कारखान्यात पडू नये म्हणून तो पत्र्यावर चढला आणि क्षणात जीव गेला #solapurnews

June 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0899542

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697