लग्नात झालेला दहा लाख रुपये खर्च आण म्हणून विवाहितेस माहेरी दिले हाकलून – सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर – लग्नात झालेला दहा लाख रुपये खर्च तुझ्या आई वडीलांकडुन घेवून ये असे म्हणून एका विवाहितेचा शारीरीक व मानसीक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
राजेश – पती, मरिया – सासु, सुनिता – ननंद, यशोदा – ननंद आणि सुजाता जॉनकुमार (सर्व रा. सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून याबाबत मेरी राजेश जगले (वय २९ वर्षे, रा. ६१, हुडको कॉलनी, सोलापूर ) हिने फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी हि दि. ३० डिसेंबर २०२५ ते दि. १९ मार्च २०२६ दरम्यान सासरी नांदत असताना वरील आरोपींनी मिळुन फिर्यादीस लग्नात झालेला दहा लाख रुपये खर्च तुझ्या आई वडीलांकडुन घेवून ये असे म्हणून शारीरीक व मानसीक त्रास देवून, शिवीगाळ, दमदाटी करून माहेरी हाकलुन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार सुरवसे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
पंजवानी मार्केट आवारात वाचमेनला अज्ञातांकडून मारहाण
सोलापूर – दुकानाची देखरेख करत बसलेल्या एका वाचमेनला अज्ञात इसमाने मारहाण करून दात पाडल्याची घटना अक्कलकोट रोड वरील पंजवाणी मार्केट आवारात रविवारी रात्री घडली .
याबाबत बसवराज शिवपुत्र इंडे ( रा. ८४, अंबिका नगर, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यातील फिर्यादी पंजवानी मार्केट मधील अमित ट्रेडर्स दुकानांसाठी वाचमेन म्हणून काम करतात . ते नेहमीप्रमाणे रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पंजवानी मार्केट कंपाउंड मध्ये बसलेले असताना एक अनोळखी व्यक्ती येवून फिर्यादी शेजारी बसला .तेव्हा फिर्यादीने त्यास तु रात्री आत कसा आला असे विचारले असता त्या अनोळखी इसमाने फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण केली . त्यात फिर्यादीचा एक दात तुटला ,तसेच सर्वांगाला मुकामार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार डोके हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 15