
सोलापूर – पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंती दिनानिमित्त महानगरपालिका येथील इंद्रभवन परिसरातील पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भास्कर सामलेटी, सिद्धू तिमिगार आदी मान्यवर उपस्थित होते.






















