Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अल-निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणीची शक्यता; पाणी काटकसरीने वापरावे    -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

तरुण भारतbyतरुण भारत
June 17, 2026
in solapur
0
अल-निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून लांबणीची शक्यता; पाणी काटकसरीने वापरावे    -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अल-निनोच्या प्रभावामुळे येणारा मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन येत्या काळातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले. उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने केवळ पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात यावा, तसेच पाण्याची गळती, गैरवापर आणि थेट जलाशयातून उपसा शेतीसाठी होणे याबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.

   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अल- निनो व टंचाईच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रवीण पाटील, अधिक्षक अभियंता उजनी धरण सकृत खांडेकर,  कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सपताळे, उप अभियंता सोलापूर महानगरपालिका एस. व्ही. एकबोटे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग आर्यन पवार, कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन सुचेता डुंबरे, कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर जी. एस. कथले, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण डॉ. एम. जे. शेख, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन ए. एस. तांबे, महावितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने उपस्थित होते.

   *जलप्रकल्पांतील उपलब्ध साठ्याचा आढावा सादर करण्याचे आदेश-

      जलसंपदा विभागाने लघु, मध्यम बंधारे व धरणे या जलप्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती सादर करून पाण्याचे नियोजन करावे. त्याचा आढावा पुढील बैठकीत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

जिल्ह्यातील जल प्रकल्पांबाबत सध्या उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजलप्रकल्प आहेत. यापैकी 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल, अशी माहिती देण्यात आली. तसेच उजनी धरणात सध्या 50.61 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे  अधीक्षक अभियंता उजनी धरण सकृत खांडेकर यांनी सांगितले.

पंढरपूर येथील पिराची कुरोली येथील पाणी पंढरपूरला घेण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याचे कार्यकारी अभियंता खांडेकर यांनी सांगितले. घाटणी बंधाऱ्यातील पाणी कोळेगाव बंधाऱ्यात सोडल्यास 15 जुलैपर्यंत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती देण्यात आली.

*शेतीपंपांचे डायरेक्ट कनेक्शन बंद करण्याबाबत सूचना-

उजनी जलाशयाच्या पाण्यासाठी शेतीपंपाचे डायरेक्ट कनेक्शन बंद करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये, असे अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले. कमी पाण्यावर येणारी पिके आणि आंतरपिके घेऊन, कमीत कमी येणाऱ्या पावसावर मूग आणि उडीद वगळता इतर पिके घेण्याचा सल्लाही देण्यात आला.

*भरारी पथके –

भरारी पथकांमार्फत गैरवापरावर तात्काळ कारवाई

भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत भरारी पथके तयार करण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल, अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा.

तसेच जलसंपदा विभागातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पाण्याची गळती होत असल्यास ती तात्काळ थांबवण्यासाठी उपाययोजना करावी, अशा सूचना दिल्या. नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, महापालिका यांच्या पाईपलाईनमधून पाण्याची गळती होत असल्यास ती दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले.

*पाणीबचतीसाठी जनजागृती आणि दैनंदिन वापरावर निर्बंध-

अल-निनोमुळे संभाव्य दुष्काळाचा धोका लक्षात घेऊन सर्व नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच पाणीबचत आणि काटकसरीने पाण्याचा वापर याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यास सांगण्यात आले.

ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे महत्व समजावण्याबाबत जिल्हा परिषदेचे सी.ओ. बीडाओ यांनी सूचना द्याव्यात, असेही नमूद करण्यात आले. शहरातील स्विमिंग पूल व वाहन धुण्याचे सेंटर तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या.

*चारा छावण्या आणि टँकर पाणीपुरवठा व्यवस्थापन-

ज्या भागात टँकरची मागणी येईल, त्या दिवशी त्या गावात टँकर ने पाणीपुरवठा करण्यासाठी आदेश निघणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने चारा छावण्या उभारण्याची वेळ येणार नाही, असा प्लॅनिंग करून तो पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.

*प्रांत अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन व तात्काळ तयारी-

प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आढावा बैठका घेऊन पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच आजच भरारी पथकासाठी विविध विभागांनी कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचित केले.

      तसेच दूरदृश्य प्रणालीवरून सर्व उपविभागीय अधिकारी व तालुका स्तरावरील तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Post Views: 8
Previous Post

आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहज समाधी ध्यान योग उत्साहात संपन्न

Next Post

महापौर कोंड्याल यांनी केले पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांना अभिवादन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महापौर कोंड्याल यांनी केले पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांना अभिवादन 

महापौर कोंड्याल यांनी केले पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांना अभिवादन 

ताज्या बातम्या

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026
३०० वर्षांची परंपरा, सर्वधर्मसमभावाचा वारसा; मानाच्या झेंडेवाली सवारीच्या स्थापनेने बार्शीत मोहरम उत्सवाला प्रारंभ

३०० वर्षांची परंपरा, सर्वधर्मसमभावाचा वारसा; मानाच्या झेंडेवाली सवारीच्या स्थापनेने बार्शीत मोहरम उत्सवाला प्रारंभ

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915071

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697