Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आता खऱ्या अर्थाने नेते खतरे मे है – आ. बच्चू कडू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 18, 2024
in solapur
0
आता खऱ्या अर्थाने नेते खतरे मे है – आ. बच्चू कडू
0
SHARES
135
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमरावती 18 नोव्हेंबर (हिं.स.)

डोक्यात जाती धर्माचे भूत घालून, हिंदू खतरे मै है… मुस्लिम खतरे में है… असे सांगायचे आणि राजकारण करायचे… आता खऱ्या अर्थाने नेते खतरे मे है… लोकांना भटकविण्याचे काम करणाऱ्यांना चारही कोन चित करायचे आहे आणि ऑटोत बसून सर्वांनी मुंबईला जायचे, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. ते अपक्ष उमेदवार प्रिती बंड यांच्या बडनेरा येथील आठवडी बाजार येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी बच्चू कडू यांनी चौफेर टोलेबाजी करीत भाजप-काँग्रेससह स्थानिक राजकारण्यांवर सुद्धा जोरदार हल्लाबोल चढविला.

बाळासाहेब ठाकरे यांनास्मृतिदिन, तारीख १७…१७ नंबरवर ऑटो चिन्ह आणि सभेची तारीखसुद्धा १७… काय योगायोग…! या ठिकाणीजमलेली गर्दी, तुम्हाला पाहून मी तर पागलच झालो, माझे डोके चक्रावले… जिकडे तिकडे लोकच लोक… इकडे निळे झेंडे… तिकडे भगवे… हिरवे…तर, माझ्या गळ्यात पिवळा दुपट्टा….! असल्याचे सांगत आ. बच्चू कडूंनी आक्रमकपणे भाषणाची सुरुवात केली. आमची बहिण किसान, मजदुरांची वाघिण आहे… डुप्लिकेट नाही… पेट्रोल कुणाचे… घासलेट कुणाचे अन् गाडी कुणाची अन् बोंबलता कुणाच्या नावानं….! आम्हाला म्हणता खोके घेतले… असे तुम्ही किती ओके आहे, हे सर्वांना माहिती आहे. केवळ स्वार्थ साधण्यासाठी वापर सुरु आहे. आज कुठेही दलित, मुस्लिम भागातील पोस्टरवरून भाजप नेत्यांचे फोटो गायब आहेत आणि…. बडनेरातून गायब आहे… आम्ही लोक काही एवढे मॅट नाही…. आता सर्वांना कळून चुकलेबरेच झाले प्रिती ताईंना ऑटो मिळाला… आता या ऑटोने धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, संविधानासोबत यांचे काय नाते आहे. कुणी कायदा पायदडी तुडविण्याचे काम करीत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा उभारून चालणार नाही तर त्यांचे विचार, संविधान डोक्यात पाहिजे, असे यावेळी बच्चू कडू म्हणाले. आपल्या बोटात हत्तीचे बळ आहे… त्याचा उपयोग प्रितीताई बंड यांचे १७ व्या नंबरचे ऑटो चिन्हाचे बटन दाबून करायचा आहे. कारण ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची, श्रीमंत विरुद्ध गरीबाची आहे. सर्वांनी सभेची गर्दी पाहून स्वस्थ बसायचे नाही. तर येत्या दोन दिवसात सर्वांनी कामाला लागून प्रितीताई बंड यांना विजयी करायचे आहे. सर्वांना ऑटोत बसून मुंबईला जावून रेकॉर्ड करायचे आहे, असे आवाहन बच्चू कडू यांनी शेवटी केले.

अभूतपूर्व सभा

बडनेरातील आठवडी बाजार परीसरात यापूर्वी उद्धव ठाकरेंची सभा झाली होती. मात्र, ही सभा महाविकास आघाडीच्या उमेदवाराची होती. एका अपक्ष उमेदवाराच्या सभेसाठी झालेली गर्दी पाहता, अभूतपूर्व रेकॉर्ड ब्रेक गर्दी सभेला झाल्याचे चित्र दिसत होते.

आपणा सर्वांची धनशक्तीविरुद्ध लढाई

ही लढाई माझी एकटीची नसून आपणा सर्वांची आहे. धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. आज मी एकटी नसून येथे बसलेले हजारो भाऊ, बहिणी, माता, पिता, युवक, युवती सर्व माझ्या पाठिशी आहे. मी आता अपक्ष नसून सर्व जनतेची उमेदवार आहे, असे मत यावेळी प्रितीताई बंड यांनी व्यक्त केले. प्रितीताई बंड यांच्या सभेदरम्यान आंबेडकरी चळवळीतील, तसेच मुस्लिम समाज,ऑटोरिक्षा संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी आपला पाठिंबा या वेळी जाहीर केला.

Post Views: 37
Previous Post

कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

Next Post

वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी सोलर सिटी बनवणार : फडणवीस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी सोलर सिटी बनवणार : फडणवीस

वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी सोलर सिटी बनवणार : फडणवीस

ताज्या बातम्या

हिप्परगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #viral #solapurnews #news

May 29, 2026

बी सी गर्ल्स हॉस्टेल व बालगृहाची सभापती संस्कृती सातपुते यांनी केली अचानक पाहणी #solapurnews #news

May 29, 2026

सोलापूरकरांनो मुंबईसाठी धावणार विशेष रेल्वे #solapurnews #viral #news

May 29, 2026

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली पहिल्याच दिवशी धडक कारवाई #viral #news #marathinews

May 29, 2026

सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून #viral #solapurnews

May 29, 2026

ईदसाठी आलेल्या हनीफ सोबत घडले विचित्र जागीच झाला मृत्यू

May 29, 2026

जरांगे पाटील करणार पुन्हा आंदोलन #viral #marathinews#news

May 29, 2026

पोलिसांनी मृत घोषित केलेली महिला जिवंत येऊन उभी राहिली पोलीस स्टेशनात

May 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0885527

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697