Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलनास सुरुवात

तरुण भारतbyतरुण भारत
June 12, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – राज्य शासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही अटी,शर्थीशिवाय सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) पक्षाच्या वतीने आमदार रोहित पाटील यांनीआपले अन्नत्याग आंदोलन अखेर सुरु केले आहे. दरम्यान वाहतूकीला अडथळा होईल हे कारण पुढेकरीत प्रशासनाकडून आमदार पवार यांना उपोषणापूर्वीच उपोषणस्थळी येवून पदाधिकाऱ्यांनानोटीस देण्यात आली. मात्र तरी देखील आमदार पवार यांनी प्रशासनाच्या नोटीशीला न जुमानता आंदोलन सुरु केले.
आमदार रोहित पवार यांचे शुक्रवारी येथे सकाळी आगमन झाले. त्यापूर्वीत्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाचीजय्यत तयारी करुन ठेवली होती. दरम्यान आमदार पवार येथे दाखल झाल्या नंतर त्यांनी शहरातीलगाडगेबाबा धर्मशाळेत येवून गाडगेबाबांच्या चरणी नतमस्तक होवून शहरातील महापुरुषांच्यापुतळ्यांना अभिवादन करीत नामदेव पायरीकडे जावून तेथूनच विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतरमंदिराला प्रदक्षिणा करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनस्थळी येवून आंदोलनासप्रारंभ केला. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नाही. हे केवळ बळीराजासाठीचे आंदोलन आहे.त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल ज्यांना ज्यांना काळजी आहे ते  सर्वजण या आंदोलनात सहभागी होवू शकतात असे त्यांनीअगोदरच जाहीर केले होते. त्या प्रमाणे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे आमदारराजु खरे यांची आमदार रोहित पवार यांच्या व्यासपीठावरील उपस्थिती डोळ्यात भरणारी ठरली.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे जिल्ह्यातील कोणतेही वजनदार नेते,पदाधिकारी मात्र या आंदोलनस्थळी दिसून आले नाहीत.
——————-
चौकट : ( आंदोलन नव्हे इव्हेंटच ) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठीचे हे आंदोलन असल्याचे आमदार रोहितपवारांकडून जरी जाहीर केले गेले असले तरी त्या आंदोलना बद्दल आंदोलनस्थळी उलटसुलट चर्चासुरु असल्याचे ऐकावयास मिळत होते. कारण दस्तुरखुद्द पदाधिकारीच हे आंदोलन नाही तर एकइव्हेंट आहे असे खासगीत बोलत होते. आंदोलनस्थळी तसेच शहरात केल्या गेलेल्या बँनरबाजीवरुन तर हे आंदोलन नव्हे तर चक्क इव्हेंटच असल्याचे दिसून येत होते.
———————
चौकट : ( शेतकऱ्यांची उपस्थित कमी, पदाधिकारी, कार्यकर्तेच जास्त)
वास्तविक शेतकऱ्यांच्या स
रसकट कर्जमाफासाठी हे आंदोलन पुकारलेलेहोते. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची उपस्थिती डोळे दिपवणारी अशी लक्षवेधक हवी होती.मात्र शेतकऱ्यांची उपस्थिती कमी त्या ऐवजी पुणे, बारामती परिसरातून आयात केलेल्या पदाधिकारीआणि कार्यकर्त्यांची उपस्थिती डोळ्यात भरणारी दिसत होती.
————————
चौकट : ( भाविकांना कमालीचा
त्रास ) सध्या अधिक महिना सुरु आहे.
पंढरपूरात गर्दी वाढत आहे. त्यामध्येचआमदार रोहित पवारांकडून शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवर बँरेकेडींग उभारण्यातआले आहे. त्यामुळे महिला, लहानमुले तसेच वयोवृध्द भाविकांना आपली चारचागी वाहने बाजूलाउभी करुन शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरुन पायी चालत ये जा करावी लागत होती. या व्यतरिक्तआंदोलनासाठी आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चारचाकी वाहनांमुळे शहरातील अनेकभागात रस्त्यांवर गाड्या पार्किंग केलेल्या दिसून आल्या. नगरपालिकेकडून छत्रपती शिवाजीमहाराज चौकाकडे येणारा रस्ता, सावरकर चौकातून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता, संतपेठभागातील रस्ते अशा शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडी होताना दिसून आल्या.त्यामुळे स्थानिक नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत होता.
——————-
चौकट : ( अन्नत्याग नव्हे अन्नदान आहे
की काय असे चित्र )
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांकडून अन्नत्याग आंदोलन छेडण्यात आले आहे. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मात्र येथे चंगळ होतअसल्याचे दिसून आले. कारण येथील मठामध्ये पदाधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता, थंडगार पाण्याच्याबाटल्यांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे अन्नत्याग आंदोलना ऐवजी अनायसा अधिक महिनाअसल्यामुळे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे की काय असे चित्र एकंदर येथीलजय्यत तयारी वरुन दिसून आले.
———————–
चौकट : ( आंदोलनातील प्रमुख मागण्या )  २०१९ च्याकर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील मर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांनासरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी.  एकवेळ समझोता (OTS) योजनेतील अन्यायकारक अटी रद्द करूनसर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. २ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्याशेतकऱ्यांसाठीही सवलतीच्या अटींसह कर्जमाफी लागू करावी.  प्रोत्साहनपर अनुदानासाठी नियमित कर्जफेडीची दोन वर्षांची अटरद्द करावी. २०१७ च्या कर्जमाफीस पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्यात्रुटींमुळे वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा.  शेतकरी विरोधी अटी रद्द करून १ रुपयात पीकविमा योजना पुन्हाप्रभावीपणे लागू करावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे पुनर्गठन करूनत्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम उपलब्ध करून द्यावी.–महेश भंडारकवठेकर १२-०६-२०२६—
Post Views: 36
Previous Post

डोंबाळवाडी येथे कृषीदूतांचे आगमन व स्वागत 

Next Post

अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासन आक्रमक; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व एसपी संधू यांची अचानक पाहणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासन आक्रमक; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व एसपी संधू यांची अचानक पाहणी

ताज्या बातम्या

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

सोलापूर जिल्हा ज्युनिअर मैदानी ॲथलेटिक्स २ व ३ ऑगस्टला

July 27, 2026

अनुसूचित जातींच्या आरक्षणात हस्तक्षेप खपवून घेणार नाही : आनंदराज आंबेडकर

July 27, 2026
ॲड. पांडुरंग घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

ॲड. पांडुरंग घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

July 27, 2026

आषाढी यात्रेच्या काळात तात्काळ उपचारामुळे हृदयविकाराच्या झटका आलेल्या ६ वारकऱ्याना मिळाले जीवनदान

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1005307

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!