तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : महापालिकेकडून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आता पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या पाणीपुरवठा संदर्भात माहिती जाणून घेता येणार आहे.
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार सोलापूर महापालिका प्रशासनाने विविध सोयी सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. त्या अंतर्गतच महापालिकेने आता सोलापूर शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ही पोर्टलवर उपलब्ध केले आहे. महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून शहराचे दैनंदिन पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक हे सोलापूर महानगरपालिकेच्या पब्लिक पोर्टल
https://watersupply.solapurcorporation.org वर उपलब्ध करण्यात आले आहे.
वीज पुरवठा खंडीत झाल्यास अथवा तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी नागरीकांनी या ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता सतीश एकबोटे यांनी केले आहे.
Post Views: 56