पंढरपूर – पत्नी प्रमाणे राहणा-या प्रेयसीच्या खुना प्रकरणी नारायण घोगरकर याला जन्मठेप व १०,००० दंडाची शिक्षा पंढरपूर येथील मे. अति जिल्हा व सत्र न्यायाधिश ओंकार देशमुख यांनी सुनावली
यात हकीकत अशी की, मुळचे राहणारे मुळशी, ता. मुभागड, जि. रायगड येथील आरोपी नारायण भु-या घोगरकर मयत मखु बळीराम मोरे व फिर्यादी नथ्थू जाधव हे तुंगत गावचे शिवारात गुन्हा घड्याळ घडण्याअगोदर एक महिन्या पासून चिलारीची झाडे तोडून त्याचा कोळसा करण्याचे काम करत होते.
यातील मयत सखू व आरोपी नारायण हे पती पत्नी सारखे राहत होते व फिर्यादी नथ्थू हा त्यांने जवळ वेगळा राहत होता. मयत व आरोपी हे किरकोळ कारणावरून वारंवार वाद करत होते. २६ मे २०१७ रोजी यातील आरोपी व मयत यांच्यात वाद झाला त्यावेळी फिर्यादी हा गावातून बाजार घेवून आला त्यांच्या समोर देखील आरोपी व मयत यांची जोरात भांडणे सुरू होती व आरोपी मयत सखु हिस काठीने मारत होता व तुला आता जिवंत सोडत नाही, तुला खलास करतो, असे म्हणत होता त्यावेळी फिर्यादीने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपी नारायण याने फिर्यादीस हातातील काठीने डाव्या खांद्यावर, मानेवर पाठीवर मारहाण केली. त्यामुळे भिती पोटी फिर्यादी त्यांच्या कोपीत येवून बसला. थोडया वेळाने मयत सखु हिचा मेली मेली असा आवाज ऐकू आला परंतु फिर्यादी आरोपी परत मारेल म्हणून तेथे न जाता कोपीत झोपला सकाळी उठून आरोपीच्या कोपीत जावून पाहिले अस ता सखु हि निश्चीत पडली होती. तिला कपाळावर डोकीत मारहाण झाली होती व ती मयत झाली होती. त्यांनतर त्याने गावातील लोकांना घडला प्रकार सांगितला. त्याप्रमाणे आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला गु.र.नं. २८०/२०१७ भा.द. वि ३०२, ५०४, ५०६, ३२३ प्रमाणे दाखल झाला होता. सदर गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर शिंदे यांनी केला व आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. त्याप्रमाणे सदर केसचे कामकाज चालले, यात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये नथ्थू जाधव डॉ योगेश्वरी माने पंच साक्षीदार तसेच ठाणे अंमलदार महिला ए एस आय शबनम शेख, तपासी अधिकारी गौरीशंकर शिंदे यांची साक्ष महत्वाच्या ठरल्या, सरकार पक्षातर्फे आरोपी व मयत यांच्यात वाद व मारहाण होताना पाहणारा फिर्यादी महत्वाचा साक्षीदार आहे. तसेच आरोपी व मयत एकत्र असताना पाहणारा देखील हा साक्षीदार आहे व घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून निघून जाणे या सर्व बाबी महत्वाच्या असून अशा परिस्थितीत घटनेशी त्याचा संबंध नाही अशी बाब न्यायालयासमोर उलटतपासात आणणे आरोपीची कायदेशीर जबाबदारी आहे. तसेच फिर्यादी हा देखील जखमी साक्षीदार आहे या सर्व बाबी सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर मांडण्यात आल्या त्या प्रमाणे झालेला एकंदरीत पुरावा याचे अवलोकन करून आरोपी नारायण घोगरकर यास भा. द. वि ३०२ करीता दोषी धरून जन्मठेप व १०,००० दंड अशी शिक्षा पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश ओकार देशमुख यांनी सुनावली. यात सरकार तर्फे सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पंढरपुर तालुका पोलीस स्टेशनचे पो नि. टी. वाय. मुजावर, व कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिता नागराळे व पोलीस हवालदार श्रीकांत धोत्रे यांनी काम पाहिले.
Post Views: 10