सोलापूर – २१ जून या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधून एनसीईआरटी आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत ‘राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत इयत्ता ३ री ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य सहभाग घेता येणार आहे. या उपक्रमात ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत १० जून २०२६ आहे. राज्यातील सर्व शाळां व कनिष्ठ महाविद्यालयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने केले आहे.
नोंदणीसाठी अधिकृत लिंक: https://www.nyoncert.in/
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ: www.nyoncert.in






















