
सोलापूर – चेतक क्लब तर्फै जागतिक मातृदिनानिमित्तच्या आईच्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ तिरंगा ब॔गला येथे पार पडला. बाबांच्या हस्ते ट्राॅफी देऊन आईला सन्मानित करण्यात आले. मुलाचे बोट धरुन पळण्याच्या स्पर्धेतिल विजेत्या आई मधील पहिला क्रंमाक रुतुजा ( स्वरा पोखरापुरकर) दुसरा क्रंमाक तन्झिला ( मोहम्मद शेख ) तिसरा क्रंमाक भाग्यश्री ( सार्थक खताल) चौथा क्रंमाक मिसबा ( सिमराह इनामदार ) पाचवा क्रंमाक सपना ( अलेक्या सानम) व पल्लवी ( लतिका मोरे) काही आईनी साडीचा अडथळा होत असताना सुद्धा आपल्या पाल्यासोबत सुसाट पळुन यश मिळविले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने करण्यात आले. तदनंतर चेतक क्लबच्या मुलांना खाऊ वाटप केले तसेच आईंना प्रेमरुपी गुलाब देण्यात आले. मुलांनी व आईंनी चेतक शिबीराबद्दलचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन नियोजन दिव्यकांत गांधींनी केले.






















