मंगळवेढा – पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाने माचणूर येथील श्री सिध्देश्वर प्रशालेला अचानक भेट देवून तेथील उपस्थित मुलींच्या अडीअडचणी समजून घेतल्या. दरम्यान मुलींच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी गुप्तपणे शाळेच्या तक्रार पेटीत टाकाव्यात असे आवाहन पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणेरी यांनी केले आहे.
मंगळवेढा पोलीस प्रशासनाने शालेय मुलींच्या तक्रारीसाठी खास निर्भया पथक स्थापन केले असून हे पथक शहरातील व ग्रामीण भागातील शाळा कॉलेजवर जावून मुलींना कोण त्रास देत आहे का? या बाबत शहनिशा या पथकाकडून केली जात आहे. सोमवार दि.13 रोजी या पथकाने श्री सिध्देश्वर हायस्कूल माचणूर,दामाजी हायस्कूल मंगळवेढा,मंगळवेढा एस.टी.बसस्थानक आदी ठिकाणी भेटी देवून मुली बाबत कोणाची तक्रार आहे का? याबाबत प्रत्यक्ष पडताळणी केली. यावेळी शालेय विद्यार्थिनींना डॉ.आरती कणेरी यांनी डायल क्रमांक 112 बद्दल माहिती दिली व मुलींच्या तक्रारी जाणून घेतल्या. काही अडचणी असल्यास शाळेतील तक्रार पेटीत तक्रारी लिखीत स्वरुपात टाकाव्यात. अन्य कोण छेडछाड करत असेल तर निर्भया पथकाशी तात्काळ संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोमवार आठवडी बाजार असल्याने आठवडी बाजारातून या पथकाने पेट्रोलींग केले.
फोटो ओळी
माचणूर येथील श्री सिध्देश्वर प्रशालेत मुलींना मार्गदर्शन करताना निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणेरी छायाचित्रात दिसत आहेत.
























