मंगळवेढा – मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बसवेश्वर जयंती उत्सव साजरा होणार असल्याने या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस प्रशासनाने शहरात रुट मार्च काढून कायदा सुव्यवस्था अबाधीत असल्याचे दाखवून दिले.
दि.14 एप्रिल पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सुरु होत आहे. तसेच दि.19 एप्रिल रोजी बसवेश्वर जयंती उत्सव होत असल्याने या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीसांनी शहरातील दामाजी चौक,शिवप्रेमी चौक,चोखामेळा चौक,बसस्थानक असा रुटमार्च काढण्यात आला. दरम्यान यामध्ये चार पोलीस अधिकारी पंधरा पोलीस अंमलदार पंचवीस होमगार्ड व एक शासकीय वाहनाचा समावेश होता. रुटमार्च काढते प्रसंगी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा पाहण्यासाठी नजरा लावल्या होत्या.

























