Monday, November 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडावरून अधिकाऱ्यांना जाब

तरुण भारतbyतरुण भारत
November 16, 2026
in soalpur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : महापालिका स्थायी समिती सभेत क्लोरीन टनर, औषधे, ड्रेनेजलाइन व रस्त्यांच्या कामांसह विविध नआठ विषयांना मंजुरी देण्यात आली तर एका विषयाची माहिती घेण्यात आली. रूपा भवानी जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी खासगी मक्तेदाराची मदत का घ्यावी लागली, असा सवाल उपस्थित करीत नगरसेवक राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.  जलवाहिनी दुरुस्तीसाठी करण्यात येणाऱ्या वॉशआऊटचे पाणी वाया न घालवता त्याची साठवण करण्याबाबत नियोजन करण्याची सूचना सभापती चाकोते यांनी केली.
           सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेच्या पटलावर एकूण नऊ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी आठ विषयांना मान्यता देण्यात आली, तर एका विषयाची माहिती घेण्यात आली. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागांतर्गत सोरेगाव, भवानी पेठ आणि पाकणी जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये पाणी शुद्धीकरण प्रक्रियेसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता किंवा संपूर्ण पुरवठा होईपर्यंत ६०० क्लोरीन टनर खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी एक कोटी ६० हजार ८०० रुपये खर्च अपेक्षित आहे.
महापालिकेच्या एकता नगर गार्डनमधील कामे, कर्णिक नगर, भैय्या वस्ती परिसरात सभामंडप बांधणे, महालक्ष्मी मंदिर परिसरातील सभामंडपाचे सुशोभीकरण तसेच महापालिकेच्या खुल्या जागांमध्ये विविध विकासकामे करण्यास मान्यता देण्यात आली. मक्तेदार नितीन मारुती ननवारे यांची वर्ग ‘क’मधून वर्ग ‘ब-१’मध्ये नोंदणी करण्यासही मंजुरी देण्यात आली.
           महापालिकेच्या दवाखाने, प्रसूतिगृहे आणि नागरी आरोग्य केंद्रांसाठी सन २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन आर्थिक वर्षांकरिता औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याचे दर मंजूर करण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार पुरवठा आदेश देण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी अर्थसंकल्पातील संबंधित तरतुदीतून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पाच ठिकाणी ड्रेनेजलाइन टाकणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत तीन ठिकाणी ड्रेनेजलाइन टाकणे, माधवनगर येथील साई मंदिर आणि पद्म मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे तसेच पाच ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक ११ मधील रियाज बागवान यांच्या घरापासून अब्बास फुलारी यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी दिलेल्या वर्कऑर्डरची माहिती सभेत घेण्यात आली.
खासगी मक्तेदाराला बोलावण्याची वेळ का आली?*
रूपा भवानी जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी खासगी मक्तेदाराची मदत घ्यावी लागल्याचा मुद्दा सभेत उपस्थित झाला. नगरसेवक राजू पाटील यांनी यावरून अधिकाऱ्यांना जाब विचारला. महापालिकेतील अधिकाऱ्यांना तांत्रिक दोष शोधता आला नाही आणि बाहेरून खासगी मक्तेदाराला बोलावल्यानंतर बिघाडाचे कारण समजले तर संबंधित अधिकारी नेमके काय करतात, असा सवाल त्यांनी केला. ही समस्या महावितरणच्या अखत्यारीतील असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांनी वेळीच पाठपुरावा करून कार्यवाही करणे अपेक्षित होते. पाणीपुरवठा विभागासाठी तांत्रिक तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची गरज असल्याची मागणी सदस्यांनी केली.
नव्या जलवाहिनी योजनेसाठीही
तयारी करणे आवश्यक : चाकोते
सोलापूर शहरासाठी १ हजार ४८३ कोटी रुपयांची नवीन जलवाहिनी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेनंतरही अशा प्रकारचे तांत्रिक दोष निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन आणि तयारी करणे आवश्यक असल्याचे सभापती रंजिता चाकोते यांनी स्पष्ट केले.
पाणी वाया गेले नव्हे तर वॉशआऊट प्रक्रिया : चौबे
अवंती नगरजवळील अभिषेक नगर येथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी वॉशआऊट घेण्यात आला होता. त्यामुळे पाणी वाया गेले नसून तांत्रिक दुरुस्तीसाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.
वॉशआऊटचे पाणी साठवण्याची गरज
 जलवाहिनी गळती अथवा दुरुस्तीच्या कामासाठी वॉशआऊट घेताना मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वॉशआऊटपूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देणे, तसेच बाहेर पडणारे पाणी साठवून अन्य कामांसाठी वापरता येईल का, याचे नियोजन करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे सभापती चाकोते यांनी सांगितले.
Views: 11
Previous Post

जुळे सोलापुरात संत जळाराम बापांची जयंती उत्साहात साजरी!

Next Post

डिसीसी बँक : मोहिते पाटलांसह 6 जणांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डिसीसी बँक : मोहिते पाटलांसह 6 जणांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

ताज्या बातम्या

बार्शीत ऊस वाहतूक बनली अपघातांना निमंत्रण

November 16, 2026

जिल्ह्यातील 198 गावांना 229 टँकरद्वारे पाणीपुरवठा

November 16, 2026

करकंब फेस्टिवलचा पारितोषिक वितरण सोहळा

November 16, 2026
राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत ‘मा.बबनरावजी शिंदे विद्यालचा डबल धमाका 

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत ‘मा.बबनरावजी शिंदे विद्यालचा डबल धमाका 

November 16, 2026
राजू शेट्टींच्या शेतकरी आंदोलनास वाव संघटनेचा पाठिंबा

राजू शेट्टींच्या शेतकरी आंदोलनास वाव संघटनेचा पाठिंबा

November 16, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. विटेकर मैदानात

November 16, 2026

तांत्रिक विद्यालयाला सुरेश केतकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला विरोध

November 16, 2026

केडर मतदारसंघात १४ उमेदवारी अर्ज दाखल

November 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1520985

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!