पंढरपूर – वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. नरकचतुर्दशी निमित्त शनिवारी देवाच्या पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मनी, दंडपेठ जोड शिरपेच मोठा, शिरपेच लहान, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, तोडे जोड, मस्त्य जोड, मोहरांची माळ, तुळशीची माळ, एकदाणि, अष्टपैलू मन्याची कंठी, चंद्रहार, हिऱ्याचे कंगन जोड इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड ,तोडे जोड, ताणवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमनी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले.
Views: 9