तभा वृत्तसेवा टेंभुर्णी / प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या वर्धपणा दिनानिमित्त २४ जुन सोमवार रोजी सायंकाळी पत संचालन काढण्यात आले .
हिंदुहृदयसम्राट डॉ. प्रवीण भाई तोगडिया यांनी स्थापन केलेल्या आंतराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्त्ववादी संघटनेला ६ वर्ष २४ जून रोजी पूर्ण झाले . यानिमित्ताने पद संचालन काढून श्रीराम मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आली.
त्यानंतर जाफराबाद रोडवरील गोंधनखेडा आश्रम येथील गौरी शंकर महादेव मंदिरात गोपूजा करुन, चारा वाटप करण्यात आला.
या वेळी श्री महेश गिरी महाराज रघुराम साहेब उखर्डे देवगिरी प्रांत उपाध्यक्ष अविनाश भाऊ देशमाने, पंकज भाऊ काबरा, विनोद इंगळे, शैलेश डोमळे, अमोल देशमुख, ऋषिकेश सोनसाळे , भारत बोहराडे ,शेखर आहेर, सोहम आवटी , विठ्ठल राधवण, शेखर आहेर, विष्णू भागवत, राहुल देशमुख, सागर इंगळे, सुनील गरडवाल, शंकर वाघ, अक्षय गांवडे, श्रीकांत उखर्डे, विनोद फदाट , योगेश भारद्वाज, संजू बनसोडे, लक्ष्मण जोशी , योगेश पेटुळे , रामा जोशी, नारायण देशमुख, लक्ष्मण उखर्डे, संतोष देशमुख , राजू केवट आदींसह बजरंग दलाचे पदाधिकारी व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.