पंढरपूर – अधिकमासाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.येणाऱ्या भाविकांचे दर्शन जलद आणि सुलभ व्हावे, तसेच दर्शनाचा कालावधी कमी करण्यासाठीमंदिर समितीने भाविकांकडून केल्या जाणाऱ्या पाद्य व तुळशी पूजा १५ जून पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा बंद केल्यानंतर दर्शनाचा कालावधी किमान दोनतासांनी कमी होईल, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
अधिक मासाला रविवार पासून (ता.१७) प्रारंभ झाला आहे. वारकरी संप्रदायामध्ये तसेच विठुरायाच्या भक्तांमध्ये या मासाला अधिक महत्त्व आहे. राज्यासह देशभरातून भाविक पंढरीत येऊ लागले आहेत. सध्या दररोज किमान एक लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
दरम्यान भाविकांची संख्या वाढल्याने पदस्पर्श दर्शनाची रांग विठ्ठल रुक्मिणी मंदिर पासून दोन किलोमीटर पर्यंत गेली आहे. गोपाळपूर रोडवरीलपाच पत्राशेड भाविकांनी भरले आहेत. त्यामुळे दर्शनाचा वेळ देखील वाढला आहे.भाविकांना कमी वेळेत जलद आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने विविध उपाय योजना केल्या आहेत. यामध्ये व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घातले आहेत.
————
चौकट : ( नोंदणी केलेल्यांना पुढील महिन्यात संधी )
ज्या भाविकांनी पाद्य व तुळशी पूजेचीया महिन्यात नोंदणी केली आहे, अशा भाविकांना अधिक मास संपल्यानंतर क्रमानुसार पाद्य व तुळशी पूजा दिली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
Post Views: 7