पिलीव – आखाती देशातील युद्धाचा परिणाम गॅस पुरवठयावर झाला का नाही हे सर्व सामान्यांना माहीत नाही पण सर्व गॅस ग्राहकांनी बुकींग केल्यानंतर एच पी 25 दिवसांनी तर भारत गॅस तब्बल 45दिवसांनी ग्राहकांना टाकी मिळते खरेतर 45 दिवस हा खुप मोठा गॅप आहे .पण पिलीव याठिकाणी काही अन अधिकृत स्वतःची एजन्सी नसणारे डिलर टाक्यांचा मोठा साठा करुन तब्बल 2000 ते 2500 रुपयाला टाकी विकत आहे हा प्रकार गेल्या दोन _ तिन महिन्यापासून सुरु आहे .ग्राहकांनचा तुमची केवायसी नाही केवापसीला वेळ लागतेय अशी वेगवेगळी कारणे देऊन ग्राहकांना गॅस दिला जात नाही .हाच हाॅटेल व गाडीमध्ये भरण्यासाठी तब्बल 2000 ते 2500 रुपयाला विकला जातो तर जी पावती निघते त्यापेक्षा 150 रुपये जास्त घेण्याचा धक्कादायक प्रकार पिलीव येथील एका अन अधिकृत डिलरकडुन सुरु आहे .दुसरीकडे टाक्यांची प्रचंड कमतरता असताना या महाशयाकडे माञ टाक्यांचा अक्षरश ठिग लागला आहे .हा धक्कादायक प्रकार याठिकाणी दोन महिन्यापासून सुरू याबाबत अनेक ग्राहकांनी पञकारांकडे तक्रारीचा पाढाच वाचला. आताच ही परिस्थीती असुन अजुन गॅस, पेट्रोल व डिझेल याच्या टंचाईचे सावट आहे .टंचाईत तर अश्या डिलरकडुन ग्राहकांची अगणीत लुट होणार, नागरिकांना अडचणी असल्यामुळे नागरिक तक्रारी करीत नाहीत याचाच फायदा असे डिलर घेत आहेत. पुरवठा विभागाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन ग्राहकांची लुट थांबवावी अशी मागणी पिलीव परिसरातील गॅस ग्राहकामधुन होत आहे . चौकट _ याबाबत माळशिरस तालुक्याचे पुरवठा अधिकारी शेटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला माञ त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















