यावेळी माहिती देताना कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक म्हणाले की संस्थेचे संस्थापक कै . सुधाकरपंत परिचारक यांनी नडलेल्या शेतकरी सभासदांना योग्य न्याय व त्यांच्या ऊसाला योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने श्रीपूरचा खाजगी कारखाना विकत घेवून तो सहकारी करून अतिशय काटकसरीने चालवून सातत्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देण्याचे काम केले तोच आदर्श पुढे ठेवून आम्ही काम करीत असल्याने आज कारखान्याचा राष्ट्रीय पातळी वर गौरव होत आहे याचा निश्चितच आनंद वाटतो . याकामी कारखान्याचे संचालक मंडळ, व्यवस्थापन व कामगार अभिनंदनास प्राप्त आहेत .
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्याने अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले यात प्रामुख्याने सौर उर्जा निर्मिती, सभासद विमा योजना, शेतकरी प्रशिक्षण, मानव विरहित वजनकाटा, रेन हार्वेस्टिंग, वृक्ष, फळ रोपे लागवड, सि.सी.टी.व्ही.चा वापर, मल्टिइंटीग्रेटेड इव्हॉपोरेशन प्लँट, कन्डेशिंग पॉलिशींग युनिट, ऑनलाईन मॉनेटेरींग सिस्टिम, ऊस विकासाच्या विविध योजना, गाळप क्षमतेचा पुरेपुर वापर, वाया जाणाऱ्या साखरेचे प्रमाण नगण्य, मिल हाऊस, बॉयलिंग हाऊसच्या कार्यक्षमतेत वाढ, सिझनमध्ये तांत्रिक बाबीमुळे कारखाना बंद राहण्याचे प्रमाण कमी, ताज्या ऊसाचे गाळप करण्यावर भर यामुळे साखर उतारा चांगला मिळणेस मदत या सर्व गोष्टींचा विचार होऊन देशपातळीवरील हा पुरस्कार असल्याचे सांगून कारखान्याने अल्पावधीमध्ये अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार पटकावून कारखान्याच्या वैभवात भर घातली आहे.




















