मंगळवेढा – कृषी विभागाच्या सर्व योजना प्रत्येक गावातील सर्व शेतकऱ्यांना पोहोचतील अशा पद्धतीने सतर्क राहून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम करावे. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेमध्ये लक्षांक वाढवून जास्तीत जास्त शेतकरी उद्योजक तयार करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न वाढवावेत. तसेच पर्जन्यमान, पीक निवडणे ,वाण निवडणे, पीक उत्पादन वाढवणे यासाठी महाविस्तार ॲप चा प्रचार आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करावी. तसेच अल निनो च्या परिणामामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आपत्कालीन नियोजन म्हणून स्प्रिंकलर संच ठिबक संच वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . तसेच बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आपत्कालीन उपाययोजना बाबत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. असे आवाहन आमदार समाधान दादा आवताडे यांनी केले.
सदर आढावा बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर बाळासाहेब लांडगे तसेच नूतन पंचायत समिती मंगळवेढा सभापती, दिपाली ताड,उपसभापती अर्जुन मल्हाळे, जिल्हा परिषद , सोलापूर सदस्य प्रदीप खांडेकर, रमेश भांजे, नूतन पंचायत समिती सदस्य विनायक यादव, सौ जयश्री कवचाळे, सुरेश कांबळे,
उद्योजक जनार्दन शिवशरण, उद्योजक हनुमंत दुधाळ, श्रीकांत गणपाटील, उपनगराध्यक्ष येताळा भगत, नगरपालिका सदस्य प्रवीण खवतोडे, कृषीभूषण अंकुश पडवळे, उद्योजक संजय कट्टे, आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी, मंगळवेढा मनीषा मिसाळ- जाधव यांनी खरीप हंगामाबाबतचे गतवर्षीचा मागोवा बाबत सविस्तर माहिती दिली व पुढील वर्षाचे नियोजन बाबत चे सादरीकरण केले. त्यानंतर खरीप हंगाम नियोजन बाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर खरीप हंगाम पीक स्पर्धा 2024-25 विजेते शेतकरी अशोक खताळ शिरनांदगी तुर, ताजुद्दीन शेख सिद्धापूर उडीद ,बसवंत पाटील सिद्धापूर उडीद, सुनील कोरे सिद्धापुर उडीद, आबासो खंडागळे भाळवणी बाजरी, पद्मिनी गायकवाड भाळवणी बाजरी, अंकुश गायकवाड भाळवणी सूर्यफूल, धर्मराज मोरे पाटखळ मका, प्रमोद येणपे नंदुर मका , अनिकेत मुंगसे बोराळे मका, विश्वनाथ पाटील मुंढेवाडी तुर, श्रीकांत निकम तळसंगी तुर, विजयकुमार मंटूर डोनज तुर, त्याबरोबर
रब्बी हंगाम 2024-25 पीक स्पर्धा विजेते शेतकरी
वरद पाटील मुंढेवाडी ज्वारी व करडई, सुमन सावंजी मंगळवेढा करडई, भारत कसबे खडकी ज्वारी, ज्ञानू लेंडवे गोणेवाडी ज्वारी, संजय जाधव मरवडे गहू, आनंदा देवकते हजापूर गहू, अमोल पवार अकोले हरभरा इत्यादी पिकांच्या पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा सन्मान आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर बाळासाहेब लांडगे यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कामकाज केल्याबद्दल सेवापूर्ती निमित्त आमदार समाधानदादा आवताडे यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर आत्मा अंतर्गत उत्कृष्ट शेतकरी म्हणून चंद्रकांत माळी , मंगळवेढा, नवनाथ हेंबाडे, ढवळस तसेच पी एम एफ एम इ योजना डी आर पी, भास्कर कुसुमडे व भारतीय कृषी विमा कंपनी तालुका प्रतिनिधी जावेद सुतार यांचा उत्तम कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत काटे उपकृषी अधिकारी मंगळवेढा यांनी केले व आभार प्रदर्शन बालाजी टेकाळे मंडळ कृषि अधिकारी नंदेश्वर यांनी केले. त्यानंतर अध्यक्षांचे परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाली.

























