मंगळवेढा – मंगळवेढा – साेलापुर राष्ट्रीय मार्गावर ब्रह्मपुरी ब्रिज जवळ गांजा विक्रीस घेऊन जाणाऱ्या शाहूअली रतिलाल धावड (वय 27 रा. ब्रह्मपुरी) याला सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडून त्याच्याजवळून 1 लाख 27 हजार 660 रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आसुन याप्रकरणी शाहूअली रतिलाल धावड ,सौरभ इंगोले( राऔंडी) , सूर्यकांत भागवत भाकरे, रा. पिसेवाडी, ब्रह्मदेव दादासो जुगदर रा. वाकी शिवनी ,जब्बार हमजेखान, मुल्ला रा. करगणी या पाच जनाविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .
यातील आरोपी शाहूआली धावड हा बेगमपूर होऊन दिनांक 9 रोजी सायंकाळी ४.२५ वाजता ब्रह्मपुरी गावच्या पुढे ब्रिज सर्व्हिस रोड वरून गांजा घेऊन जानार आसल्याची गाेपनिय माहीती गून्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक जगताप यांना मिळताच त्यानी मार्गावर साफळा लावला यादरम्यान आराेपी धावड माेटरसायकलवर पाठीवर माेठी बँग बांधून येत आसताना पाेलीसांनी इषारा केला मात्र ताे न थांबता ताे पुढे जात आसताना पाेलीसांनी पाठलाग करून पकडले, त प्रवासी बॅग मध्ये चार किलो 128 ग्राम वजनाचा म्हणजेच 82 हजार 560 रुपये किमतीचा गांजा सापडला.पाेलीसांनी माेटार सायकल, माेबाईल व गांजा आसा ऐकुण १ लाख २७ हजार६६० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
गेल्या तिन महिन्यापासुन आराेपी गांजा विक्री व्यवसाय करीत आसल्याची माहीती समाेर आली आसुन झट पट श्रींमत हाेन्याच्या इच्छेपाेटी ताे गांजा विक्रीच्या तस्करीत आडकल्याची खमंग चर्चा ऐकावयास मिळत हाेती. ताे आराेपी साैरंभ इंगाेले(रा.औढी) याच्याकडुन घेऊन विक्रीचा व्यवसाय करीत आसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही कामगीरी पाेलीस आधिक्षक आतुल कुलकर्णी,यांचे मार्दशनाखाली पाे.नि. संजय जगताप अमित बाबर सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस अंमलदार नीलकंठ जाधवर, सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, जयवंत सादुल, राहुल दोरकर, हरीश थोरात, अन्वर आतार, सुनील पवार,बाळराजे घाडगे,राजेंद्र गवेकर आदी पाेलीस पथकाने बजावली आहे


























