सदाशिवनगर – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे तालुका माळशिरस या ठिकाणी २० जुलै रोजी होत असून या रिंगण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सरपंच राणी मोहिते यांनी दिली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे तालुका माळशिरस या ठिकाणी संपन्न होत आहे. या रिंगण सोहळ्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने मैदान तयार करण्यात आले असून या मैदानावरील काटेरी झुडपे काढण्यात आली आहेत ,या मैदानाचे मुरमीकरण करण्याचे काम सुरू असून रिंगण आखणी करण्यात आली आहे. स्वागत कमान उभारण्यात येणार आहे.तसेच तसेच पुरंदावडे गावातील सर्व रस्ते स्वच्छ करून काटेरी झुडपे काढण्यात आली आहेत.गटारी स्वच्छ करण्यात आल्या आहेत. औषध फवारणी करण्यात येणार आहे..या सोहळ्याच्या तयारीसाठी सरपंच राणी मोहिते ,उपसरपंच देविदास ढोपे, ग्रामसेवक सचिन बनकर, पोपट गरगडे,विठ्ठल अर्जुन,संतोष शिंदे,प्रकाश कुंभार,हरी राऊत,संतोष ढगे, ओम ओव्हाळ,महादेव बोराटे,चव्हाण, ज्ञानदेव पालवे,विजयसिंह पालवे आदी परिश्रम घेत आहेत
चौकट
ओव्हर ब्रीज मुळे रिंगण सोहळा पाहणे सुलभ
रिंगण ठिकाणी पालखी मार्गाचा ओव्हर ब्रिज असल्याने वारकरी व भाविकांना नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहणे सुलभ होणार आहे.
Post Views: 7