Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘गंगा निवास’मध्ये जपल्या डॉ. बाबासाहेबांच्या आठवणी

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in solapur
0
‘गंगा निवास’मध्ये जपल्या डॉ. बाबासाहेबांच्या आठवणी

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 43;

0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर दौऱ्याच्या आठवणी आजही शहराच्या मनात जिवंत आहेत. त्या केवळ इतिहासाच्या पानांत नाहीत, तर फॉरेस्ट परिसरातील ‘गंगा निवास’ या  सुंदर घरात आजही श्वास घेत आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या शेवटच्या सोलापूर भेटीला यंदा ८० वर्षे पूर्ण होत असताना, या वास्तूमधील प्रत्येक कोपरा त्यांच्या सहवासाच्या स्मृतींनी भारलेला दिसतो. जिथे प्रत्येक भिंत एक कथा सांगते आणि प्रत्येक कोपरा अभिमानाने भरलेला आहे. 

          विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर शहर – जिल्ह्यात अनेक वेळा आले. त्यांच्या पदस्पर्शाने ही नगरी क्रांतीप्रवण झाली. १४ जानेवारी १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब ‘मद्रास मेल’ने सोलापुरात आले. त्यावेळी

हणमंतु सायण्णा पसलेलू (गार्ड) यांनी आपल्या घराचे दरवाजे केवळ पाहुणचारासाठी नव्हे, तर इतिहास घडवण्यासाठी उघडले होते. ‘गंगा निवास’मध्ये डॉ. बाबासाहेबांचा मुक्काम घडला आणि  हे घर एका चळवळीचा साक्षीदार बनले. १९४० साली बांधण्यात आली. इमारतीची देखणी रचना, सुसज्ज आतील सजावट आणि हॉलमधील आकर्षक टाईल्स आहेत. आतील फर्निचर कर्नाटकी कलाकुसरीचे असून सागवानी लाकडाचे आहे. त्या काळात गंगा निवाससारखी भव्य वास्तू परिसरात नव्हती. डॉ. बाबासाहेबांना आणण्यासाठी त्यांनी खास हिलमन कार आणली गेली. तो प्रवास केवळ एका नेत्याचा नव्हता, तर समाज परिवर्तनाच्या विचारांचा होता. 

            या दौऱ्यात त्यादिवशी समता सैनिक दलाच्या जवानांनी  स्वागत केले. त्यादिवशी डॉ. बाबासाहेबांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. सावरकर मंडळाच्या तिळगूळ समारंभात त्यांनी प्रभावी भाषण करत समाजप्रबोधन केले. तसेच रॅडिकल पार्टीच्या बैठकीत सहभाग नोंदवून स्थानिक राजकीय घडामोडींना दिशा दिली. सरकारी वकील अ‍ॅड. जी. आर. देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वनही व्यक्त केले. हरिभाई देवकरण शाळेतील मुळे सभागृहात जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिका यांच्या वतीने बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. बी. सी. होस्टेल येथे दलित विद्यार्थी फेडरेशनच्या सभेत त्यांनी सोलापूरकरांना मार्गदर्शन केले. या वेळी दादासाहेब गायकवाड व पा. ना. राजभोज यांची उपस्थिती होती. सभेत त्यांनी जीवप्पा ऐदाळे यांना असेंबलीच्या निवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन केले होते.त्या काळात जीवप्पा सुभाना ऐदाळे हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे आमदारकीचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूरात आले होते.

गंगा निवास : वस्तूंमध्ये जपलेला स्पर्श

आजही गंगा निवासमध्ये एक ताट, एक ग्लास, एक तांब्या खुर्ची… साध्या वाटणाऱ्या या वस्तूंमध्ये इतिहासाचा स्पर्श जपला गेला आहे. डॉ. बाबासाहेबांनी वापरलेले हे दैनंदिन साहित्य केवळ वस्तू नाहीत, तर त्या क्षणांचे साक्षीदार आहेत, जेव्हा या घरात विचारांचा दिवा पेटला होता. गार्ड कुटुंबीय आजही त्या आठवणींना तितक्याच जिव्हाळ्याने जपतात. हणमंतू गार्ड यांचे नातू प्रकाश पसलेलू हे आजही याच घरात राहतात. जिथे प्रत्येक भिंत एक कथा सांगते आणि प्रत्येक कोपरा अभिमानाने भरलेला आहे.

 जुनी होत चाललेली वास्तू , 

जिवंत राहिलेला इतिहास

काळाच्या ओघात गंगा निवासची इमारत जुनी झाली आहे पण आठवणी मात्र अजूनही ताज्याच आहेत.

ही केवळ एक वास्तू नाही तर हा आंबेडकरी चळवळीचा जिवंत दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठेव्याचे जतन करणे ही केवळ गार्ड कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.

या ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण गंगा निवास वाचला, तर इतिहास जिवंत राहील. इतिहास जिवंत राहिला, तर प्रेरणा कायम राहणार आहे.

 ‘गंगा निवास’ इतिहास जपणारी वास्तू

 – ठिकाण : फॉरेस्ट परिसर, सोलापूर शहर.

– डॉ.बाबासाहेबांची भेट : १४ जानेवारी १९४६

– आगमन : ‘मद्रास मेल’ने सोलापुरात प्रवेश

– मुक्काम : हणमंतू सायण्णा गार्ड यांचे ‘गंगा निवास’

– प्रवास : हिलमन कंपनीची कार

– जतन केलेल्या वस्तू : ताट, तांब्या, ग्लास, 

     कप, फुलपात्र, डायनिंग टेबल.

– सोलापुरात प्रमुख कार्यक्रम : सावरकर मंडळ तिळगूळ समारंभातील भाषण, रॅडिकल पार्टी बैठक, हरिभाई देवकरण शाळेत मानपत्र स्वीकार, बी.सी. होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

– सद्यस्थिती : वास्तू जुनी असून संवर्धनाची तातडीची गरज

Post Views: 48
Previous Post

उजनीतील वाळू माफियांवर पोलिसांचा मोठा घाव; ५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा : महापौर  कोंडयाल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा : महापौर  कोंडयाल

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा : महापौर  कोंडयाल

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024999

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!